राष्ट्रीय

देशाचा विकास गतीने – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वतंत्र दिनानिमित्त दिल्लीतल्या लालकिल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासीयांना संबोधित केले.देश स्वतंत्र होऊन ८० व्या वर्षात पदार्पण करत असतांना गेल्या बारा वर्षात विकासाचा वेग जलद गतीने वाढला.२०४७ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा विकसीत भारताचे स्वप्न आणि ध्येय पूर्ण होईल आणि भारताची तशी वाटचाल सुरू आहे. गेल्या बारा वर्षात जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन ही बदलला आहे.भारत आता दुसऱ्या देशावर अवलंबून न राहता आता आत्मनिर्भर झाला पाहिजे असे म्हटले आहे.जगात अनेक गोष्टी स्वस्त,लवकर मिळतात त्या घेतल्याने आपले सामर्थ्य वाढणार नाही त्यासाठी आपल्याला आत्मनिर्भर व्हावे लागेल.आपल्या हिताची सुरक्षा आपल्यालाच करायची आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधले आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाची उत्सुकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तेरव्यांदा दिल्ली च्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित केल.आज प्रत्येक भारतीयांच्या मनात तिरंगा आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी बलिदान दिले त्यांना देश आज श्रद्धांजलि अर्पण करत आहे. आपल्या ७३ मिनिटांच्या भाषणात मोदी यांनी विद्यार्थी ,युवक महिला एआय तंत्रज्ञान तसेच देशाला पुढे न्यायचे असेल तर लहान स्वप्न पाहून चालणार नाही तर मोठे स्वप्न पहावे लागतील असे म्हंटले

किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरंम गान गायले गेले.

गेल्या बारा वर्षात देशातील कोट्यवधी गरीब-श्रीमंत,शहरी ग्रामीण नगरीकणी समर्पणच्या भावनेने देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करतो त्यामुळे त्यामुळेच २५ कोटी कुटुंबियाना दारिद्रय रेषेच्या खाईतून वर काढले आहे. एकेकाळी भारताची अर्थव्यवस्था कमकुवत होती आज मात् जगात आपण पहिल्या पाच देशात समावेश आहे.

वैचारिक नक्षलवाद ,देशविरोधी विचारावर प्रहार

देशातून नक्षलवाद संपत आला आहे.समाजविघातक वैचारिक नक्षलवाद करणाऱ्याना ओळखून त्यांना बाजूला करण्यात यावे. देशांतर्गत आणि सीमापार नक्षलवाद यांचा समर्थपणे सामना करावा लागेल.

एक कोटी तरुणांना एअयाय ट्रेनिंग एक वर्षात देण्याची घोषणा केली भारताला जागतिक पातळीवर
इनोव्हेशन हब बनवण्याचे यामागे उदिष्ट आहे.

लाल किल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी शक्ति की सप्तधारा प्रमुख क्षेत्राची घोषणा

शक्ति की सप्तधारा

उत्पादन : जागतिक मानकानुसार गुणवत्ता खर्च,आणि उत्पादन प्रमाण स्पर्धात्मक असणे आवश्यक आहे.

कृषि आणि अन्न प्रक्रिया: आपल्या उत्पादणणा जागतिक ब्रॅंड बनवण्याची गरज

तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम : डिजिटल आणि दळणवळण तंत्रज्ञावर लक्ष केंद्रित करण्याची गरज.

गति-शक्ति : जलद आणि अखंड कनेक्ट असणे यावर लक्ष केंद्रित करणे.

रक्षा शक्ति : द्रोण ,सुपरसोनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे.

हरित आणि नील अर्थव्यवस्था :आपल्याकडे असलेल्या सांसाधनांचा अर्थव्यस्थेसाठी उपयोग करणे

देशाच्या सॉफ्ट पॉवर : योग,आयुर्वेद,समग्र आरोग्य,सर्जनशील संसाधणे, पर्यटन यांना मान्यता देणे.

Related Articles

Back to top button