Plane hijack जखमी पायलट स्मित माच्छार यांनी वाचवले १८० प्रवाशांचे प्राण

मुंबई — संयुक्त अरब अमिरातहून इस्रायल जाणाऱ्या प्रवासी विमानात दोन वैमानिकांमध्ये हाणामारी झाली त्यात एक ओमान देशाच्या वैमानिकाने दुसऱ्या भारतीय वैमानि स्मित माच्छार यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर हे विमान आपत्कालीन परिस्थितीत सौदी अरेबियातील ताबुक विमानतळावर उतरविण्यात आले.
दुबईहून तेल अविवसाठी आज सकाळी उड्डाण केलेल्या ‘फ्लाय दुबई’ कंपनीच्या विमानात हा प्रकार घडला. विमानाने दुबईहून उड्डाण केल्यानंतर अडीच तासांनंतर विमानातून धोक्याचा इशारा दिला गेला. हे विमान ३३ हजार फूट उंचीवरून एका मिनिटातच १७हजार फुटांपर्यंत खाली आले. काही वेळातच जॉर्डनच्या किनाऱ्यावर काही गिरक्या मारल्यानंतर विमान ताबुक विमानतळावर उतरले. विमानातील सर्व १८० प्रवासी सुखरूप आहेत.
हा सर्व प्रकार घडला आणि समयसूचकता दाखवणारा भारतीय पायलट स्मित मच्छार हे मुंबईतल्या चेंबूर टिळकनगर मधील रहिवासी आहेत.टिळकनगरधील स्वस्तिक अपार्टमेंट मधील १४ माळ्यावर त्यांचे आई वडील राहतात.
त्यांनी स्पाइस जेट या हवाई कंपनीत काम केले होते त्यानंतर गेल्या चार वर्षापासून ते फ्लाय दुबई हवाई कंपनीत पायलट म्हणून नोकरी करत आहेत असे त्यांचे शेजारी अक्षय दोषी यांनी सांगितले.काल रात्री स्मित यांचे आई वडील हे सौदी अरेबियाच्या ताबुकला रवाना झाले आहेत.स्मित यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.लवकरच ते बरे होतील.भारतात आल्यावर त्यांचे आम्ही जंगी स्वागत करू असे त्यांच्या इमारतीत राहणारे लक्ष्मीकांत जोशी यांनी सांगितले.आम्हाला अभिमान आहे स्मित यांचा त्यांनी १८० जणांचे प्राण वाचवले.जगात भारतीयांची मान यामुळे उंचावली असेही त्यांनी म्हटले आहे.
जिहादी दहशतवाद्यांनी इस्त्राईलमध्ये विमान कोसळवून इस्रायली प्रवाशांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावा इस्राईलने केला आहे. इस्त्राईलने आपली काही लढाऊ विमानेही सौदीच्या दिशेने रवाना केली होती. हल्लेखोर वैमानिकाला अटक करण्यात आली आहे.



