राष्ट्रीय

CJP Protest: ‘पोलिसांनी अडवलं, तेच आपलं जंतर मंतर’; अजिंक्य शिंदेंचे थेट आवाहन.

प्रशांत गोडसे

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) शनिवारी (१० ऑक्टोबर) जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली असतांना दिल्लीत आंदोलन सुरु आहे. केली होती. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह तीन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला होता . अखेर दिपके यांनी व्हिडीओद्वारे आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवली म्हटलं आहे . त्यानंतर शिंदे यांनीही व्हिडीओ पोस्ट करून आंदोलकांना जंतर मंतरवर येण्याचे आवाहन केले आहे.

विमानातूनच दिपकेंना ताब्यात घेतले

अभिजीत दिपके हे मुंबईहून एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीला गेले होते. शनिवारी सकाळच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी त्यांना विमानातूनच ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत आशुतोष रांका आणि सौरव दास यांनाही ताब्यात घेण्यात आले. या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती आहे.

या कारवाईमुळे जंतर मंतरवरील आंदोलनाचे काय होणार, याबाबत प्रश्न उपस्थित होतं होतें . मात्र, दिपके यांनी समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित करून आंदोलनाच्या नेतृत्वाबाबत भूमिका स्पष्ट केली. तिघेही पोलिसांच्या ताब्यात असेपर्यंत अजिंक्य शिंदे आंदोलनाचे नेतृत्व करतील, असे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अजिंक्य शिंदे कोण आहेत?

अजिंक्य शिंदे हे कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटन सचिव आहेत. पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनाच्या आयोजनातही त्यांचा सहभाग होता. सदर आंदोलनावरून शिंदेंवर गुन्हा दाखल असल्याचं बोललं जात आहे.अजिंक्य शिंदे यापूर्वी महाराष्ट्रात आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे संयोजक होते. आपच्या प्रमुख नेत्यांसोबतचे त्यांचे फोटोही समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. त्यामुळे CJPमधील त्यांची भूमिका आणि आम आदमी पार्टीशी असलेले त्यांचे जुने संबंध यांची चर्चा सुरू झाली आहे.शिंदे हे ‘स्कूल ठीक करो’ या मोहिमेत महत्त्वाचा भाग आहे. इन्स्टाग्रामवर त्यांचे सुमारे २३ हजार फॉलोअर्स आहेत.

अजिंक्य शिंदेंचे आंदोलकांना आवाहन

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनापूर्वीच CJPच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पक्षासमोर आव्हान निर्माण झाली होती . अशा परिस्थितीत अजिंक्य शिंदे यांनी व्हिडीओ पोस्ट करून आंदोलकांना जंतर मंतरवर येण्याचे आवाहन केले आहे.

“पोलिसांनी ज्या ठिकाणी अडवलं, तेच आपलं जंतर मंतर समजून तिथेच आंदोलन सुरू करा,” असे आवाहन अजिंक्य शिंदे यांनी केले आहे. प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका CJPने घेतली आहे. त्यामुळे आता पोलिसांची कारवाई आणि आंदोलकांची पुढील भूमिका काय असेल. नेत्यांना ताब्यात घेतल्याने आंदोलन थांबणार की आंदोलकांचा आवाज आणखी बुलंद होणार, याचे उत्तर आगामी घडामोडींतून मिळणार आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर CJP ठाम असून, दिल्लीतील आंदोलनाची पुढील दिशा आता अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वावर अवलंबून असेल.

Related Articles

Back to top button