मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी खोटेप्रतिज्ञापत्र देण्याचा दबाव?

मनसे न्यायालयात जाणार
संदीप देशपांडे यांचा आरोप;
निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मुंबई : मतदार यादीतून नाव वगळले गेल्याच्या तक्रारीनंतर नाव पुन्हा समाविष्ट करण्यासाठी काही नागरिकांकडून खोटे प्रतिज्ञापत्र भरून घेण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. या कथित प्रकाराविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या काही नागरिकांची नावे प्रारूप मतदार यादीतून गायब झाली आहेत. ही नावे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी संबंधित नागरिकांना मतदार यादीत नाव नसल्याबाबत खोटे प्रतिज्ञापत्र देण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा देशपांडे यांनी केला. खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्यास एक वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असतानाही असा दबाव टाकला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
मतदार यादीत कोणाचे नाव समाविष्ट करायचे किंवा वगळायचे, याचा अधिकार निवडणूक नोंदणी अधिकारी अर्थात ईआरओ यांच्याकडे असल्याचे देशपांडे यांनी नमूद केले. दादरमधील मनसेचे शाखाध्यक्ष संतोष साळी यांचे नावही प्रारूप मतदार यादीतून गायब झाल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून नागरिकांवरील कथित दबाव थांबवावा, अशी भूमिका मनसेने घेतली आहे
मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवींच्या मुद्द्यावरही देशपांडे यांनी भूमिका मांडली. “एफडी साठवून ठेवण्यासाठी नसतात. फक्त मोडत असाल, तर त्या जनतेच्या कामासाठीच वापरा,” असे ते म्हणाले. महापालिकेच्या निधीचा वापर नागरिकांच्या हितासाठी व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कोस्टल रोडवरील भरावाबाबत उत्तर देण्याची मागणी
मुंबई कोस्टल रोडवरील भरावाच्या मुद्द्यावरून देशपांडे यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उत्तर द्यावे, अशी मागणी केली. या प्रकरणातील नेमका आक्षेप आणि संबंधित प्रशासनाची भूमिका याबाबत अधिक स्पष्टता येणे आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे यांनी खोचक सवाल केला. “शिंदे गावाला गेलेत की इथेच आहेत? इथेच असतील, तर मग नाराज नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला.
एफडीच्या मुद्द्यावरून पालिकेला सल्ला