ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील सह्यांची मोहीम पोलिसांनी रोखली; मनसेच्या १५ ते २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेसाकीनाका पोलिसांची कारवाई;

मुंबई : निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सह्यांची मोहीम राबविण्याच्या तयारीत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) साकीनाका विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वाखाली संघर्षनगर येथे ही मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, आंदोलनासाठी परवानगी नसल्याचे सांगत साकीनाका पोलिसांनी भानुशाली यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेले.आंदोलनासाठी परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी महेंद्र भानुशाली यांच्यासह उपस्थित १५ ते २० कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. तेथे आंदोलन न करण्यासंदर्भातील कागदपत्रावर सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना महेंद्र भानुशाली म्हणाले, “आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो. मात्र, पोलिसांनी दडपशाही करत आम्हाला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवून पोलीस ठाण्यात नेले. तेथे आमच्याकडून सह्या घेण्यात आल्या.”
दरम्यान, आंदोलनाला परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी ही कारवाई केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या घटनेमुळे संघर्षनगर परिसरात मनसेच्या नियोजित सह्यांच्या मोहिमेला अडथळा निर्माण झाला.



