मुंबई

जोगेश्वरीत १.११ कोटींचे चरस जप्त; २३ वर्षीय तरुणाला अटक,

एसव्ही रोडवरील मॅक कॅफेसमोर पोलिसांची कारवाई; १,११३ ग्रॅम चरस हस्तगत

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने जोगेश्वरी येथे कारवाई करत विक्रीसाठी चरस जवळ बाळगल्याच्या आरोपावरून एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली. मोहम्मद कासिफ फारूख शेख (वय २३, रा. घोडपदेव, माझगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून अंदाजे १ कोटी ११ लाख ३० हजार रुपये किमतीचे १,११३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे येथील गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. यावेळी जोगेश्वरी बस डेपो परिसरातील एसव्ही रोडवर, मॅक कॅफेसमोर संशयित व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्याकडून १,११३ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रेचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Back to top button