मुंबई

Imran Khan News: CJP आंदोलन भोवले? इमरान खान यांना भारत सोडण्याचे आदेश

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर अभिनेता इमरान खान चर्चेत आला आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना २८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत भारत सोडण्याची नोटीस दिल्याचे वृत्त आहे. इमरान खान हे बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांचे भाचे असून, त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे.

ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनानंतर कारवाई

१० ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निदर्शने करण्यात आली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. इमरान खान यांचाही त्यात सहभाग होता. या वेळी पोलिसांनी त्यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते.

या घटनेनंतर आता इमरान खान यांना भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे आंदोलनातील त्यांच्या सहभागाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

अमेरिकेचे नागरिकत्व, भारतात OCI कार्डवर वास्तव्य

इमरान खान हे भारतीय नागरिक नसून अमेरिकेचे नागरिक आहेत. ते भारतात राहण्यासाठी ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्डाचा वापर करतात. या कार्डामुळे भारतात वास्तव्य करण्यासह काही सुविधा मिळतात; मात्र त्यातून भारतीय नागरिकत्व मिळत नाही.

माध्यमांतील वृत्तानुसार, परदेशी नागरिक असूनही राजकीय आंदोलनात सहभागी झाल्याच्या कारणावरून त्यांच्याविरोधात इमिग्रेशनविषयक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात संबंधित कायदेशीर तरतुदींचा आधार घेत भारत सोडण्याची नोटीस दिल्याचे वृत्त आहे.

आंदोलनातील सहभाग, परदेशी नागरिकत्व आणि भारतातील वास्तव्य यांवरून आता हे प्रकरण चर्चेत आले आहे.

अभिनेता इमरान खान यांना भारत सोडण्याची नोटीस दिल्याच्या वृत्तावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे ही खरोखरच कारवाई आहे की केवळ चर्चेचा धुरळा, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Related Articles

Back to top button