मुंबई

Election Battle: पाच जागांवर बंडखोरीचे आव्हान; महायुती-मविआची आज कसोटी

मुंबई : विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी आज (९ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपत आहे. दुपारी ३ नंतर अंतिम उमेदवार स्पष्ट होणार आहे . महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार काही ठिकाणी आमनेसामने असल्याने बंडखोरी रोखण्यासाठी पक्षांची धावपळ सुरू आहे.

पुणे पदवीधरमध्ये तिरंगी लढत? भाजपच्या डॉ. स्मिता जाधव, शिंदे शिवसेनेचे सचिन सानप आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात लढतीची शक्यता आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, शिंदे शिवसेनेचे मंगेश चिवटे, काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि ठाकरे शिवसेनेचे सुनील जगताप मैदानात आहेत.

नागपूरमध्ये कराळे मास्तरांची चर्चा भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यासह अनिल सोले, संजय थुल आणि नितेश कराळे मास्तर यांनीही अर्ज दाखल केले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये चव्हाण यांच्यासमोर आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि ठाकरे शिवसेनेचे दिलीप घुगे यांच्यासह भाजपचे एम. के. देशमुख आणि प्रतापसिंह पाटील यांनी अर्ज भरले आहेत.

अमरावतीत बहुरंगी लढत काँग्रेसच्या अदिती पोहरे, ठाकरे शिवसेनेचे दत्तात्रय लहाने, शिवसेनेचे किरण सरनाईक यांच्यासह अनेक उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे येथेही मतविभाजनाची शक्यता आहे.

आज दुपारी ३ नंतर अंतिम उमेदवारांची यादी स्पष्ट होईल. २३ ऑक्टोबरला मतदान, तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. वंचितने चार ठिकाणी उमेदवार उतरवले आहे. वंचितचे उमेदवार कोणाला डोकेदुखी ठरणार.मित्रपक्षांतील बंडखोरी आणि मतविभाजनाचा फायदा कोणाला होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button