सरन्यायाधीशांनी भेट नाकारल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणान्यायालयीन प्रकरणावरून चित्रा वाघ यांची राहुल गांधींवर टीका

मुंबई : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी यांची भेट घेण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसची अवस्था ही अपयशाची असून पक्षाकडून राजकीय नाटके केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयीन प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. न्यायालयीन मार्गाने येण्याऐवजी राजकीय पद्धतीने हा विषय उपस्थित केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना करत वाघ यांनी काँग्रेसच्या राजकीय कामगिरीवर टीका केली. जनतेने काँग्रेसला वारंवार नाकारल्याचा दावाही त्यांनी केला.
आज काँग्रेसची अवस्था म्हणजे ‘अपयशाचा ब्रँड आणि नौटंकीचा कारखाना!’
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी “न्यायालयीन प्रक्रियेने या, राजकीय स्टंटबाजीने नाही” असं ठणकावून राहुल गांधींना भेट नाकारली. जिथे जाल तिथे पराभव, तरीही नौटंकी थांबत नाही!
एकीकडे १४० कोटी जनतेच्या विश्वासाचा तळपणारा सूर्य मोदीजी, तर दुसरीकडे अपयशाच्या अंधारात चाचपडणारा दिवा राहुल गांधी!
जनतेने तुम्हाला कालही नाकारलंय, आजही नाकारलंय आणि उद्याही तुमच्या पराभवाचाच इतिहास लिहिला जाईल!
अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.



