मुंबई

चेंबूरमध्ये १० लाखांचे मेफेड्रॉन जप्त; दोघांना अटक

गुन्हे शाखेच्या आझाद मैदान युनिटची कारवाई; ३३१.४९ ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची तस्करी केल्याच्या संशयावरून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ३३१.४९ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे किंमत १० लाख १४ हजार ४७० रुपये आहे. ही कारवाई १४ ऑक्टोबर रोजी आर. सी. मार्ग, चेंबूर येथे करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाचे आझाद मैदान युनिटचे पथक चेंबूर परिसरात गस्त घालत असताना दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना आढळल्या. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला.

पहिल्या आरोपीकडून ११७.५८ ग्रॅम, तर दुसऱ्या आरोपीकडून २१३.९१ ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. दोघांकडून मिळून ३३१.४९ ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत १०,१४,४७० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Related Articles

Back to top button