आंतरराष्ट्रीयमनोरंजन

“गोंधळ” ऑस्करच्या व्यासपीठावर गोंधळ घालण्यास सज्ज

प्रशांत गोडसे

मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीला अभिमानाची बाप ठरणारी मोठी घोषणासमोर आली आहे. संतोष डावखर यांनी दिग्दर्शन केलेल्या “गोंधळ” या मराठी चित्रपटाची ऑस्कर 2017 साठी भारताचे अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (FFI) ने बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म या श्रेणीत गोंधळ चित्रपटाची निवड करण्यात आल्याची घोषणा केली आहे. “गोंधळ” चित्रपटाच्या ऑस्कर प्रवेशामुळे मराठी चित्रपट सृष्टीचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी ऑस्कर साठी देशभरातून विविध भाषेतील 33 हुन अधिक चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया कडे आले होते. हिंदी भाषेत 14,मराठी तेलगू आणि गुजराती भाषेतील प्रत्येकी चार,तमिळ 3 तर मल्याळम व नागामी भाषेतील प्रत्येकी एक चित्रपटाचा सामेश होता. हिंदी आणि इतर भाषांना कडवी टक्कर देत “गोंधळ” चित्रपटाने आखिर बाजी मारली. प्रभावी कथा,उत्कृष्ट निर्मिती कौशल्या आणि थ्रिलर चे योग्य प्रकारे बांधणी यामुळे हा चित्रपट ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करेल अशा प्रकारचा निर्णय ज्यूरींनी घेतला.

चित्रपटाची निवड करण्यासाठी फिल फेडरेशन ऑफ इंडिया ने एक विशेष समिती गठीत केली आहे. पी.शेषाद्री, विजय पाटकर, शांती कुमार,संजय पराशर, साबू जोसेफ, अनिल थॉमस, विवेक वासवानी, बिजोन दासगुप्ता, हितू कानोडिया,हसन,वासन, तनिष्ठा चटर्जी आणि संजय पाटील.

एक सायकॉलॉजिकल थ्रिलर

महाराष्ट्रातील लोकपरंपरा असलेल्या गोंधळ आणि धार्मिक विधीवर असलेला गोंधळ चित्रपट आहे. संतोष डावकर यांनी दिग्दर्शन आणि चित्रपटाचे लेखन केले आहे. एका नवविवाहित जोडप्याच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. रात्रभर सुरू असलेल्या या गोंधळाच्या कार्यक्रमाच्या अवतीभोवती चित्रपटाची कथन फिरत असते. धार्मिक कार्यक्रम,राजकीय सूड , गुन्हेगारी आणि सस्पेन्स ड्रामा या सर्व गोष्टींचा समावेश या चित्रपटात बघायला मिळतो. किशोर कदम ईशाता देशमुख,योगेश सोहनी निषाद भोईर आणि सुरेश विश्वकर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहे. “गोंधळ” या चित्रपटाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया ( iffi) मध्ये “सिल्वर पिकॉक अवार्ड ” (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) सन्मान मिळाला आहे.

Related Articles

Back to top button