सलमान खानने बिग बॉस 20 मध्ये तमन्ना भाटियाचं केलं भरभरून कौतुक!

प्रांजली कुलकर्णी
‘बिग बॉस 20’च्या वीकेंड का वारमध्ये यावेळी बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकारांची खास उपस्थिती पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या आगामी मायथो-फँटसी-थ्रिलर ‘द व्वान: फोर्स ऑफ द फॉरेस्ट’च्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर पोहोचले. हा चित्रपट २५ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शोदरम्यान सलमान खानने तमन्नाचं केलेलं कौतुक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तमन्ना बोलत असताना सलमानने अचानक सिद्धार्थ मल्होत्राकडे वळून तिचं कौतुक करत म्हटलं, “काय अप्रतिम आवाज आहे तिचा यार!” सलमानचं हे कौतुक ऐकताच तमन्ना लाजली आणि तिने त्याचे आभार मानले.
‘समझो ना’ गाण्याचीही चर्चा
तमन्ना आणि सिद्धार्थच्या आगामी चित्रपटातील ‘समझो ना’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. या गाण्याला ५५ दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, विविध भाषांमधील YouTube ट्रेंडिंगमध्येही गाण्याने अव्वल स्थान मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. गाण्यातील तमन्ना आणि सिद्धार्थची केमिस्ट्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
याशिवाय तमन्नाच्या ‘छठी मैया’मधील कामाचीही चर्चा आहे. यामध्ये तिने छठ पूजा विधींचं सादरीकरण केल्याचं पाहायला मिळतं. या भूमिकेसाठी तिचं कौतुक झाल्याचं सांगितलं जात आहे.
बिग बॉसच्या मंचावर धमाल
‘बिग बॉस 20’च्या नव्या प्रोमोमध्ये सिद्धार्थ आणि तमन्ना सलमान खानसोबत डान्स करताना दिसत आहेत. आपल्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थने ‘द व्वान’मधील रहस्यांचा उल्लेख केला. यावर सलमानने त्यांना “रहस्य कधी उलगडणार?” असा प्रश्न विचारला.
यावर तमन्नाने चित्रपटातील रहस्य २५ सप्टेंबरला समोर येणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर तमन्नाने ‘बिग बॉस 20’मधील स्पर्धक काजी तौकीरकडे त्याचा प्रसिद्ध हुक स्टेप शिकण्याची इच्छा व्यक्त केली. काजीनेही तिला आपला हुक स्टेप करून दाखवली.
दरम्यान, शोच्या आणखी एका प्रोमोमध्ये सलमान खानने काजी तौकीरच्या अभिनयाची नक्कल करत एक मजेशीर प्रसंग सादर केला. सलमानने सीने में दर्द असल्याचा अभिनय करत जमिनीवर पडल्याने काही क्षणांसाठी स्पर्धकही घाबरले. मात्र, त्यानंतर हा केवळ मनोरंजनाचा भाग असल्याचं स्पष्ट करत सलमानने वातावरण हलकं केलं.
सलमानने काजीच्या अभिनयाचं कौतुक करताना, “अक्टिंगच्या बाबतीत तौकीरने खूप चांगलं केलं आहे,” असं म्हटलं. यावर अरिश्फा खाननेही सलमानचं कौतुक केलं. या संपूर्ण प्रसंगामुळे ‘बिग बॉस 20’च्या आगामी भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सलमान खानच्या आगामी चित्रपटाबाबतही चर्चा सुरू आहे. तो लवकरच ‘मातृभूमि’ या चित्रपटात दिसणार असून, या चित्रपटाचं दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची नवीन तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.



