मनोरंजन

Nana Patekar Passes Away : सिनेसृष्टीवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मुंबई : दमदार आवाज, प्रभावी अभिनय आणि सामाजिक बांधिलकी यामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. गोव्यातील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमीपासून हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या दमदार संवादफेकीसह संवेदनशील आणि वास्तववादी अभिनयाची कायमच चर्चा झाली. ‘नटसम्राट’सह अनेक गाजलेल्या भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची ताकद प्रेक्षकांसमोर सिद्ध केली.

अभिनयासोबतच नाना पाटेकर सामाजिक कार्यासाठीही ओळखले जात होते. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत करण्यासोबतच जलसंधारण आणि ग्रामीण भागातील विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.

नाना पाटेकर यांच्या निधनाने केवळ रंगभूमी आणि सिनेसृष्टीनेच नव्हे, तर सामाजिक कार्याच्या क्षेत्रानेही एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व गमावले आहे. आपल्या अभिनयाने आणि सामाजिक कार्याने त्यांनी निर्माण केलेला ठसा कायम स्मरणात राहील.

Related Articles

Back to top button