मनोरंजन

जुन्या घराला भेट देत इंडियन आयडॉल विजेता अभिजीत सावंतने दिला जुन्या आठवणीना उजाळा !

इंडियन आयडॉल विजेता ट्रेंड सेटर गायक अभिजीत सावंत कायम त्याचा सदाबहार आवाजाने प्रेक्षकांच मन जिंकून घेत असतो. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तो त्याचा कामाचे अपडेट देत असताना नुकताच अभिजीतने एक खास व्हिडीओ शेयर केला आहे.

जिथून अभिजीतने त्याचा करिअरची सुरुवात केली अश्या जुन्या घराच्या आवारातून त्याने हा खास व्हिडीओ पोस्ट करून जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे. अभिजीत ने त्याची बायको शिल्पा सोबत जुन्या घराच्या आवाराची खास झलक देऊन तिथे साजरा होणार गणेशउत्सव देखील यात दाखवला आहे.जुनं घर, तिथला परिसर आणि आयुष्यात जिथे तो घडला या संपूर्ण आवाराची खास झलक त्याने या व्हिडीओ मध्ये कैद केली आहे.

इंडियन आयडॉलचा पहिला वहिला विजेता ते आजच्या तरुणाईला त्याचा आवाजाने मंत्रमुग्ध करणारा अभिजीत कायम वैविध्यपूर्ण गाणी करुन प्रेक्षकांच मनोरंजन करतोय. आगामी काळात हा सांगतिक प्रवास नव्या प्रोजेक्ट मधून लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार असल्याचं कळतंय.

Related Articles

Back to top button