मुंबई

SIR Update: भिवंडी पूर्वमध्ये ४९% मतदारांची नावे वगळल्याचा रईस शेख यांचा दावा.

मुंबई : भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत तब्बल १ लाख ८४ हजार ७१६ मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. मतदारांची नावे बेकायदा पद्धतीने वगळण्यात आल्याचा दावा करत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली असून, ही नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

रईस शेख यांनी गुरुवारी (15 ऑक्टोबर) या संदर्भात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भिवंडी पूर्व या त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये मध्ये एसआयआर प्रक्रियेदरम्यान कशा पद्धतीने मत चोरी झाली, याचे पीपीटी सादरीकरण केले आणि पुरावे दिले. एसआयआर प्रक्रिया दरम्यान भिवंडी मध्ये 42हजार 430 मतदारांची तफावत दाखवण्यात आली, 25 हजार 230 मतदारांमध्ये विसंगती दाखवण्यात आली. फॉर्म ७ चा गैरवापर करून भाजपचे बीएलए 12 हजार पेक्षा अधिक नावे वगळण्याचा प्रयत्न केला आहेत. तसेच 17 हजार 200 मतदारांना मॅपिंगबाहेर ठेवले आहेत, असा आरोप रईस शेख यांनी केला.

पत्रकार परिषदेला भिवंडी- निजामपूर महानगरपालिकेचे उपमहापौर तारीक मोमीन, स्थायी समिती अध्यक्ष ईशा खान, प्रभाग समिती चेअरमन हसनईन फारुकी, तब्बसूम मिर्झा, समिना अन्सारी तसेच नगरसेवक प्रशांत लाड आणि रोहिदास वाघमारे उपस्थित होते.

रईस शेख म्हणाले की, भिवंडीतील जे मतदार तिथे राहतात त्यांना एसआयआर प्रक्रियेदरम्यान कायमचे स्थलांतरीत दाखवले गेले. नोंदणी अर्ज (Enuremation Form) भरलेला असूनही हजारो मतादारांची नावे मतदार यादीतून वगळली आहेत. अनेकांचे EF अर्ज बूथ स्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडून गहाळ केले आहेत.

भिवंडी पुर्व मतदारसंघात SIR प्रक्रियेत अनेक मनमानी झाली आहे. जे मतदार येथील रहिवाशी आहेत, त्यांच्याविरोधात अर्ज 7 दाखल करण्यात आले आहेत. ज्यांनी अर्ज 7 अर्ज दाखल केले, ते येथील रहिवासी नाहीत. ते स्थानिक मतदारांना ओळखत नाहीत. मुस्लीम, दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय मतदारांना लक्ष्य करण्यासाठी विशिष्ट विचाराच्या कार्यकर्त्यांनी अर्ज क्रमांक 7 दाखल केले आहेत, असा आरोप रईस शेख यांनी केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ऑगस्ट २०२३ मध्ये BLA नियुक्त करताना त्याचे नाव त्या भागातील मतदान यादीत असणे अनिवार्य केले हाेते. तसेच BLA प्रतिदिन कमाल १० अर्ज सादर करु शकत होता. मात्र १ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या बदलानुसार BLA त्या विधानसभा मतदारसंघातून नियुक्त जात आहे. त्यामुळे मतदारांची नावे वगळण्याच्या संख्येत वाढ झाली असून याचा फटका दलित, मुस्लीम आणि आदिवासी मतदारांना बसत असल्याचा दावा रईस शेख यांनी केला.

मतदारांना त्यांच्या नावाची वस्तुस्थिती समजावी म्हणून raisshaikh137.mahatalent.org आम्ही संकेतस्थळ विकसित केले. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून एसआयआर प्रक्रियेतील गोंधळाची वस्तुस्थिती जाणून घेतली. मतदारांमध्ये मोठा रोष आहे. मताची चोरी झाल्याची भावना आहे. भिवंडी मध्ये ‘व्होट चोर गद्दी छोड’ असे आंदोलनही झाले. मतदारांनी भिवंडीमध्ये एसआयआर प्रकियेतील मनमानी विरोधात उत्स्फुर्तपणे सह्यांची मोहीम राबवली असून सह्यांचे निवेदन राज्यपाल महोदय यांना लवकरच देणार असल्याचे रईस शेख म्हणाले.

वर्तमान एसआयआर प्रक्रिया मतचोरी आहे. विशिष्ट विचाराच्या राजकीय पक्षाला निवडणुकीत लाभ पोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रक्रियेत हटवण्यात आलेली नावे पुनर्स्थापित करावीत. ज्यांनी एसआयआर प्रक्रिया मनमानी पद्धतीने राबवली, त्यांची चौकशी करण्यात यावी व दोषींवर कारवाई व्हावी, असे निवेदन केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पाठवल्याचे रईस शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

Back to top button