मुंबई

Drought Alert: महाराष्ट्राच्या दुष्काळासाठी तटकरे मोदींच्या भेटीला

मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागांना केंद्र सरकारकडून मदत मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी बुधवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील दुष्काळाची गंभीरता लक्षात घेऊन केंद्राने आवश्यक मदत करावी, अशी मागणी त्यांनी या भेटीत केली .

राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे संकट गडद होत असताना शेतकरी आणि ग्रामीण भागाला दिलासा मिळण्यासाठी केंद्राच्या मदतीकडे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली.

या भेटीत रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाचा मुद्दाही त्यांनी मांडला. या कामासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला असून, विकासकामाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधानांनी वेळ द्यावा, अशी विनंती तटकरे यांनी केली.

दुष्काळग्रस्तांना मदत आणि रायगडच्या विकासाला गती, या दोन्ही मुद्द्यांवर आपण प्रयत्नशील असल्याचे तटकरे यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून म्हटले आहे .

Related Articles

Back to top button