मुंबई

INDIGO FILGHTS सौदी अरेबियातील सुरक्षेच्या परिस्थितीमुळे इंडिगोची उड्डाणे स्थगित


रियाध, जेद्दाह, दमाम आणि मदिना येथील विमानसेवा १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द

मुंबई :
सौदी अरेबियातील बदलत्या सुरक्षेच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडिगो एअरलाइनने सौदी अरेबियातील चार शहरांसाठीची विमान उड्डाणे १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत रद्द केली आहेत. यामध्ये रियाध, जेद्दाह, दमाम आणि मदिना या शहरांकडे जाणाऱ्या तसेच तेथून येणाऱ्या विमानांचा समावेश आहे.

रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्याने हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीमुळे इंडिगोसह अन्य विमान कंपन्यांनीही आपल्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

इंडिगोने प्रवाशांना विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी आपल्या विमानाचे सद्यस्थितीतील वेळापत्रक तपासण्याचे आवाहन केले आहे. तिकीट आरक्षित करताना दिलेल्या संपर्क क्रमांकावर संबंधित प्रवाशांना अद्ययावत माहिती पाठवली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एअर इंडिया आणि आकासा एअर या कंपन्यांनीही सौदी अरेबियातील काही शहरांसाठीची उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित केली आहेत. त्यामुळे सौदी अरेबियाला जाणाऱ्या आणि तेथून भारतात परतणाऱ्या प्रवाशांनी प्रवासापूर्वी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button