महाराष्ट्रमुंबई

MPSC Controversy: अध्यक्षांना हटवा; आदित्य ठाकरेंचे राज्यपालांना पत्र

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षांविरोधातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्षांना पदावरून दूर ठेवावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली आहे. अध्यक्षांना पदावरून हटविण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करावी, अशी मागणीही त्यांनी राज्यपालांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.

आदित्य ठाकरे पत्र काय

MPSC अध्यक्षांविरोधातील तक्रारींच्या चौकशीसाठी समितीची शिफारस

चौकशी सुरू असताना MPSC अध्यक्षांनी पदावर राहणे योग्य नसल्याचे पत्रात नमूद.

चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची मागणी.

राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे अध्यक्षांना पदावरून हटवण्याची शिफारस करावी, आदित्य ठाकरे यांची मागणी

दरम्यान पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता . MPSCमधील कथित गैरप्रकारांवरून त्यांनी सरकारवर टीका केली. MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

‘चंदा चोर, वोट चोर, पेपर चोरांची टोळी सत्तेत असेल तर विद्यार्थ्यांना न्याय कसा मिळणार?’, असा सवाल ठाकरे यांनी केला. विद्यार्थ्यांनी एकजूट कायम ठेवावी आणि अध्यक्ष हटेपर्यंत आंदोलनातून उठू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मुंबईतील MPSC कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची तयारी देखील दर्शवली होती

आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रातून केलेल्या मागणीवर आता राज्यपालांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button