रुग्णालयातील वैद्यकीय साहित्याचे दर अवाध्यव्य, तुकाराम मुंढे यांनी केली पोलखोल. ₹११.०५च्या IV सेटची MRP ₹३२५; सिरिंज आणि कॅथेटरच्या दरातही मोठी तफावत
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे नियुक्त झाल्यापासून चर्चेत आहेत. हॉटेल तसेच उत्तर आस्थापनावर छापे टाकून बेकायदेशीर काम करणाऱ्यावर वाचक निर्माण केला आहे. आता त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असताना रूग्णालय प्रधान जे साहित्य वापरते त्याच्या किमतीवर प्रकाश टाक केंद्रशासनाच्या एन पी पी ए ला पत्र लिहून मार्गदर्शक सूचना करण्याचे त्यांनी समाजमाध्यमांच्या एक्स वर पोस्ट केली आहे.
रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बिलामध्ये समाविष्ट होणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या किमती आणि त्याच्या प्रत्यक्ष खरेदी दरामध्ये मोठी तफावत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याच्या किमतींच्या अभ्यासात काही वस्तूंच्या ट्रेड प्राइस आणि छापील कमाल किरकोळ किमतीत (MRP) मोठा फरक आढळून आला आहे.
या सर्वेक्षणानुसार, ₹११.०५ ट्रेड प्राइस असलेल्या IV इन्फ्युजन सेटची MRP ₹३२५ असल्याचे आढळले. म्हणजेच ट्रेड प्राइसच्या तुलनेत MRPमध्ये तब्बल २,८४१ टक्क्यांची तफावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ₹६.७५ला खरेदी केलेल्या सिरिंजची MRP ₹५७.२०, तर ₹२९.४१ला खरेदी केलेल्या कॅथेटरची MRP ₹३१० असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
रुग्णालयात उपचार घेत असताना अशा वैद्यकीय साहित्याची आवश्यकता ही ऐच्छिक नसते. त्यामुळे रुग्णाला त्याची किंमत तपासणे, पर्यायी उत्पादन निवडणे किंवा बाजारातील इतर किमतींशी तुलना करणे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे ट्रेड प्राइस आणि MRPमधील मोठी तफावत ही केवळ किंमतीचा प्रश्न नसून रुग्णांना उपलब्ध असलेल्या माहितीच्या पारदर्शकतेचाही प्रश्न असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित करण्यात आले आहे.
सध्या Drugs (Prices Control) Order, 2013 अंतर्गत अनुसूचित औषधांच्या किमतींवर नियमन आणि मर्यादा आहेत. मात्र अनेक वैद्यकीय उपकरणे आणि उपभोग्य साहित्याच्या किंमत निर्धारणाबाबत अशी व्यापक मर्यादा नसल्याने उत्पादक, वितरक आणि रुग्णालयांच्या खरेदी प्रक्रियेमधील किंमत तफावत पारदर्शक करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर वैद्यकीय साहित्याच्या ट्रेड प्रोक्युअरमेंट प्राइस आणि घोषित MRPमधील अनुमत तफावतीबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याची शिफारस Department of Pharmaceuticals आणि National Pharmaceutical Pricing Authority (NPPA) यांच्याकडे करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वैद्यकीय साहित्याच्या किमतीत पारदर्शकता आणल्यास रुग्णांवरील आर्थिक भार आणि किंमतीबाबतची माहितीची दरी कमी करण्यास मदत होऊ शकते, असा या शिफारशीमागील उद्देश आहे.केंद्र सरकार याबाबत काय पाऊल उचलते ते पाहणे उचित ठरणार.



