STतील दोषी अधिकाऱ्यांना अभय? बरगे यांचा गंभीर आरोप

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार व नेमून दिलेल्या कामातील हलगर्जीपणा, कुचराई आदी गंभीर आरोप लाऊन आरोपपत्रे दिलेल्या ४० पेक्षा जास्त दोषी अधिकाऱ्यांना सक्षम प्राधिकार्यांनी कमी शिक्षा दिल्या असून यातील काही अधिकाऱ्यांना राज्यभरात तर त्यातील काहीना मध्यवर्ती कार्यालयात महत्त्वाच्या पदांवर बढती देण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
बरगे यांनी पुढे म्हटले आहे की,एसटी महामंडळात राज्यभरात सगळीकडे विशेषतः मध्यवर्ती कार्यालयात महत्त्वाच्या विभागांमध्ये दोषी ठरवण्यात आलेल्या संधी मिळाल्याने सक्षम प्राधिकाऱ्यांचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले असून एसटीच्या प्रशासनातील शिस्त व आवेदन पद्धतीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एसटी महामंडळातील सुमारे ४० अधिकाऱ्यांना विविध गंभीर प्रकरणांमध्ये आरोप लाऊन चौकशी किंवा शिस्तभंगाच्या कारवाईच्या कक्षेत आणले मात्र बढती देताना त्यांना किरकोळ शिक्षा देण्यात आल्या सोडण्यात आहे आहे. दोषी ठरवून अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अहवालात लावलेली गैरव्यवहाराची कलमे दुर्लक्षित करण्यात आली आहेत. सुरक्षा व दक्षता विभागाने व अन्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या अभ्यासातून केलेल्या चौकशीत आर्थिक गैरव्यवहार व कामातील हलगर्जीपणा व कुचराई सारखे आरोप लाऊन पुरावे सादर करण्यात येऊन सुद्धा काही दोषी अधिकाऱ्यांना वरिष्ठ सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्दोष ठरवण्यात आले आहे. ही बाब गंभीर असून आज महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले असताना व उत्पन्न कमी होत असताना अशा गंभीर आरोप असलेल्या दोषी , भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना निर्दोष ठरवण्याचे प्रकार दोषींना अभय देण्यासारखे असल्याचेही बरगे यांनी म्हटले आहे.
एसटीत ५०, रुपयांच्या किरकोळ अपहारासाठी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. मग भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना अभय का देण्यात आले आहे असा प्रश्न उपस्थित करून राज्याचे परिवहन मंत्री व एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी लक्ष घालून निर्दोष ठरविलेल्या अधिकाऱ्यांची प्रकरणे पुन्हा तपासून त्यात्या स्थरावरील सक्षम प्राधिकाऱ्यांकडून पुनर्विलोकन करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.



