मुंबई

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी Shiv Senaची मदत; Eknath Shinde यांची घोषणा

मुंबई : दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना मुला-मुलींच्या लग्नासाठी थेट मदत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून ही मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरून अधिकृतपणे सांगितले.

दुष्काळ, नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना मुलांच्या लग्नाचा खर्च उभा करणे अशक्य होते. याच विवंचनेतून काही शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडतात, असे निरीक्षण शिंदे यांनी नोंदवले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

दुष्काळी जिल्ह्यातील ज्या शेतकरी कुटुंबांमध्ये मुला-मुलींचे लग्न ठरले आहे, त्यांनी स्थानिक शिवसेना लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आवश्यक ती मदत पक्षामार्फत उपलब्ध करून दिली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

याआधी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन “तुमची दिवाळी काळी होऊ देणार नाही” असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिला होता. त्यानंतर राज्य शासनाने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. आता शिवसेनेच्या माध्यमातून थेट लग्न मदतीचा हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार आहे.

Related Articles

Back to top button