मुंबई

Raj Thackeray on Action! ‘‘गर्जना’ मोर्चासाठी राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांशी संवाद

मुंबई : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात तसेच लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या वतीने रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी भव्य ‘गर्जना’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांपासून जिल्हाध्यक्ष आणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मोर्चाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. मोर्चाची तयारी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग याबाबत त्यांनी आढावा घेतला.

लोकशाही टिकवण्यासाठी हा लढा महत्त्वाचा असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या ‘गर्जना’ मोर्चात पदाधिकारी, महाराष्ट्रसैनिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर मनसेकडून मोर्चाच्या तयारीला वेग आला असून, विविध स्तरांवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नियोजन करण्यात येत आहे. मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहावेत, यासाठी पक्षाच्या वतीने जनसंपर्कावरही भर दिला जात आहे.

Related Articles

Back to top button