मुंबई

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची देवगिरी निवासस्थानी सदिच्छा भेट;भेटीदरम्यान राज्यातील विविध विषयांवर सविस्तर संवाद…

मुंबई: भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

यावेळी नितीन नबीन यांनी आदरणीय अजितदादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. भेटीदरम्यान राज्यातील विविध विषयांवर सविस्तर संवाद तसेच महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांबाबतही चर्चा करण्यात आली.

या भेटीच्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, मंत्री मंगल प्रभात लोढा, युवा नेते खासदार पार्थ पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार संजय बनसोडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button