नाल्यात सुका कचरा टाकल्याप्रकरणी पालिकेची कारवाही

मुंबई : मुंबई महानगर पालिकेने नियुक्त केलेल्या सुका कचरा संकलन केंद्र चालवणाऱ्या संस्थेने ठरवून दिलेल्या जागी कचरा न टाकता मोगरा नाल्यात टाकला.यावर पालिकेकडून पोलिस तक्रार करण्यात आली असून त्यावर ओशिवरा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३१ वाजता समाजमाध्यमावर अपलोड केलेल्या विडीओ पोस्टमध्ये अंधेरी पश्चिममधून गोळा केलेला कचरा मोगरा नाल्यात टाकण्यासाठी बीएमसीच्या टेम्पोंचा वापर केला जात आहे.हा विडीओ समोर आल्यानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाने ओशिवरा पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६(क) (सार्वजनिक नाल्यात अडथळा किंवा पाणी साचून नुकसान करणे), २७० (सार्वजनिक उपद्रव), २७१ (रोगप्रसार होण्याची शक्यता असलेले निष्काळजी कृत्य) आणि ३२४(३) (सरकारी किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालमत्तेसह मालमत्तेचे नुकसान किंवा इजा करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ओशिवरा पोलिसांनी सुका कचरा संकलन केंद्र चालवणाऱ्या संस्थेच्या प्रमुखाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. अंधेरीतून गोळा केलेला सुका कचरा पुनर्वापरासाठी निर्धारित वर्गीकरण केंद्रात नेण्याऐवजी मोगरा नाल्यात टाकला जात असल्याचे आढळून आले होते.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक, ५४ वर्षीय अनिश बोरिचा यांच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पालिकेने सुक्या कचरा व्यवस्थापनासाठी अंधेरी विभागाची १६ विभागांमध्ये विभागणी केली आहे. ‘आकार मुंबई’ नावाच्या एका खाजगी संस्थेवर या विभागांमधून सुका कचरा गोळा करून तो पुनर्वापरासाठी निश्चित केलेल्या सुक्या कचरा वर्गीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तक्रारीत तीन वर्गीकरण केंद्रांचा उल्लेख आहे, एक जोगेश्वरी पश्चिम येथील अजित ग्लास येथे, दुसरे यशराज स्टुडिओच्या मागे वीरा देसाई रोडवर आणि तिसरे जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील कापसवाडी येथे.
तक्रारीनुसार, ही तिन्ही केंद्रे ‘आकार मुंबई’च्या नियंत्रणाखाली आहेत. ‘राजकुमार चौकी’ भागातून गोळा केलेला सुका कचरा यापैकी एका निश्चित केंद्रावर नेणे अपेक्षित होते. त्याऐवजी, तो कचरा मोगरा नाल्यात टाकण्यात आला. ओशिवरा पोलिस चौकशी करत आहे.
पालिका अलर्टमोड
कचरा टाकण्याच्या प्रकरणानंतर पालिका alrtmodvar आली असून सात दिवसांत सर्व वर्गीकरण केंद्रांची तपासणी होणार
मोगरा नाल्यात एका वाहनाने कथितरित्या सुका कचरा टाकल्याच्या घटनेनंतर, पालिकेने शहरव्यापी तपासणी आणि सुका कचरा संकलन व वर्गीकरण केंद्रांवर कडक देखरेख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने सर्व सहायक आयुक्तांना विहित एसओपीनुसार, सात दिवसांच्या आत आपापल्या प्रभागातील प्रत्येक सुका कचरा संकलन आणि वर्गीकरण केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणीदरम्यान, अधिकाऱ्यांना ऑपरेटरच्या कार्यादेशांची वैधता, तैनात वाहने आणि चालकांचा तपशील, तसेच वाहनांमध्ये बसवलेली जीपीएस/व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीम (VTMS) उपकरणे कार्यरत आहेत की नाही, हे तपासण्यास सांगण्यात आले आहे.
याचबरोबर काही ठिकाणी उपकंत्राटां देण्यात आली आहेत त्याचीही नोंद घ्यावी आणि धिकाऱ्यांना प्रत्येक केंद्रावरील स्त्रोतानुसार कचरा संकलन आणि फेऱ्यांची नोंद, प्राप्त झालेला, पुनर्प्राप्त केलेला, नाकारलेला आणि पाठवलेला कचऱ्याचा दैनंदिन साठा, तसेच अंतिम साठा देखील तपासावा लागणार आहे. पुनर्वापर करणारे आणि प्रक्रिया केंद्रांकडून मिळालेल्या पावत्या आणि अधिकृतता, तसेच नाकारलेल्या कचऱ्याचे अंतिम ठिकाण देखील तपासले जाईल. महापालिका अधिकाऱ्यांना केंद्रांवरील सीसीटीव्ही कव्हरेज आणि फुटेजची देखभाल तपासण्याचे, तसेच अग्निसुरक्षा, इमारत आणि कचरा संकलन मानकांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. कोणतेही अनधिकृत उपकंत्राट किंवा कचऱ्याचे वळवणे याची नोंद घ्यावी लागेल.
घटना: अंधेरी पश्चिम येथील मोगरा नाल्यात (लोखंडवाला बॅक रोड) ड्राय वेस्ट टेम्पोमधून कचरा टाकला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
कारण: गोळा केलेला सुका कचरा अधिकृत वर्गीकरण केंद्रात न ने लता नाल्यात बेकायदेशीरपणे फेकला गेला.
बीएमसीची पावले: ‘आकार मुंबई’ या संबंधित संस्थेला व वाहन चालकाला कारणे दाखवा नोटीस (Show-Cause Notice) बजावण्यात आली.
पोलिस कारवाई: ओशिवरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला असून एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला आहे.
पुढील निर्देश: संतोषजनक स्पष्टीकरण न मिळाल्यास संस्थेचा कामाचा आदेश रद्द करून त्यांचे चालन केंद्र बंद करण्याचे इशारे देण्यात आले आहेत



