मुंबई

अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे मुबईकर त्रस्त

मनोज कुळकर्णी

मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील काही भागात कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठा होत आहे.मुंबईत सण उत्सव सुरू झाले आहेत.या पार्श्वभूमीवर योग्य दाबाने मुंबईकरांना पाणी पुरवठा झाला पाहिजे याचे नियोजन मुंबई महानगर पालिकेकडून केलं जात आहे.गेल्या सोमवारी मुंबई महानगर पालिकेची महासभा झाली होती त्यावेळी नगरसेवक अजित रावराणे यांनी हा प्रश्न उचलून धरला होता यावर सत्ताधारी नगरसेवकांनी चर्चाही केली होती.त्याच वेळी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मात्र सभात्याग केल्याने ते या चर्चेत सामील झालं नव्हते.आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून हजर असलेले अतिरिक्त आयुक्त यांनी त्वरीत ही समस्या सोडवण्याचे आश्वासन सभागृहाला दिले होते.

गणेशोत्सवात मुंबईकरांना अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातच पाणी कपात अद्यापही लागू असल्याने ही कपात मागे घेण्याची मागणी सर्वच स्तरातून होत असतानाही महापालिकेने यावर भूमिका स्पष्ट केलेली नाही अपूरा आणि कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यावर महापालिकेत अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून यामध्ये आठवड्याच्या विशिष्ट दिवशी प्रभावित भागांना सुरळीत आणि पूर्ण पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवापासून याचे नियोजन केले असून त्यामुळे गणेशोत्सवात दिलासा
देण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेकडून केला जाणार आहे.

कुठे कुठे होती कमी दाबाने पाणी पुरवठा

  • पी पूर्व आणि पी पश्चिम वॉर्ड असलेल्या मालाडमधील काही भागात
  • ए वॉर्डमधील कुलाबा, फॉर्टमधील काही भागात
  • पी दक्षिण वॉर्डमधील गोरेगावमध्ये
  • एलू वॉर्ड असलेल्या कुर्ला,

साकीनाका येथे कपूर्व वॉर्ड असलेल्या अंधेरी पूर्व, जागश्वरी पूर्व वॉर्ड ,वी वॉर्ड असलेल्या डोंगरी,भेंडीबाजार तसेच

प्रभाग क्रमांक ४३ मधील मालाड अनेक दिवसांपासूनी भागात कमी दाबाने दूषित पाणी नळाला येत आहे. हा मुद्दा उपस्थित करत त्नगरसेवक अजित रावराणे यांनी थेट पी पश्चिम वॉर्ड कार्यालयासमोर आंदोलनच केले होते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीची बैठक बोलावली व पाणी नियोजनाच्या यामध्ये प्रभावित भागांमधे पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

धरणातील जलसाठा ९६ टक्के

मुंबईला ४ हजार ६०० दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याची गरज लागते. सध्या चार हजार १०० दशलक्ष लिटर पाणी दिले जाते. सुमारे ५०० दशलक्ष लिटर पाणी कमी आहे. पाणी कपातीमुळे पातळी कमी होत असून उंचावर आणि लांब असलेल्या वस्त्यांना मोठी पाणी समस्या येत आहे. तर जुन्या चाळींना अंडरग्राऊंड टाकी नाही. त्यामुळे त्यांनाही पाणी पुरवठ्याची समस्या येत आहे. मुंबईत ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तर सप्टेंबर महिन्यातही पाऊस नाही.

सध्या धरणातील पाणीसाठा ९६ टक्के आहे.पालिकेकडून पाणीटंचाई हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे. ज्या भागातून कमी दाबाच्या, अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. त्याचे मॅपिंग महापालिकेकडून करण्यात येत आहे. प्रत्येक भागातील मागणी व पुरवठ्याच्या आधारावर तक्रारींचे विश्लेषण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अतिरिक्त जिथे अपुरा पाणी पुरवठ्याचे कारण आढळल्यास तेथे पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करण्यासाठी विशिष्ट दिवस निश्चित केले जाणार आहेत. सूचना केल्या आहेत. तर गळती त्यानुसारही नियोजन करण्याच्या शोधण्यावरही लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

Related Articles

Back to top button