मुंबई
मुंबई समाचार मराठी वेबसाईटच उद्घाटन मालक मेहरवानजी कामा यांच्या हस्ते थाटात संपन्न.

मुंबई: 205 वर्षाची परंपरा असलेल्या मुंबई समाचार च्या मराठी वेबसाईटचा उद्घाटन सोहळा आज मालक मेहरवानजी कामा यांच्या हस्ते पार पडला.यावेळी मुंबई समाचाराचे संपादक निलेश दवे,उद्योगपती डॉ.योगेश लाखांनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेहरवानजी कामा सर यांच्या हस्ते Marathi Mumbai Samachar वेबसाईटचे काउंटडाऊन करत लोकार्पण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना माननीय मेहरवान कामाजी म्हणाले की मुंबई समाचार आता आपल्या मायबोलीत म्हणजे मराठीत आले आहे मराठी वाचकांसाठी आता मुंबई समाचार मराठी भाषेत असणार आहे. सर्वांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केलं विशेष म्हणजे जय महाराष्ट्र म्हणत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र राज्य गीताने करण्यात आली.



