मुंबई

मुंबई समाचारची विशेष गणेशोत्सव स्पर्धा सुरू; आपल्या घरच्या गणपती सजावटीचा व्हिडिओ पाठवा आणि आकर्षक बक्षिसे जिंका

मुंबई: गणेशोत्सवाच्या मंगलप्रसंगी आपल्या भक्ती आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी, आशिया खंडातील सर्वात जुने वृत्तपत्र ‘मुंबई समाचार’ने भव्य ‘मुंबई समाचार महागणेशोत्सव’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या अनोख्या स्पर्धेद्वारे, गणेशभक्त आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्तीचा भक्तीभावाने सजवलेल्या पर्यावरणपूरक मूर्ती आणि पूजा मंडप मखर सजावटीचा व्हिडिओ पाठवून आकर्षक बक्षिसे जिंकू शकतात.

मुंबई समाचार आपल्या डिजिटल आणि प्रिंट माध्यमांद्वारे स्पर्धकांची कला आणि भक्ती,लाखो वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवली जाणार आहे.. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक प्रवेशिकेला बाप्पाकडून एक विशेष भेटवस्तू देखील दिली जाईल.

विविध श्रेणींमध्ये आकर्षक पारितोषिके दिली जातील:

सर्वोत्तम घरगुती गणपती सजावट: प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक
सर्वोत्तम आकर्षक गणपती सजावट: १ विजेता,
सर्वोत्तम पर्यावरणपूरक गणपती सजावट: ३ विजेते,
सर्वोत्कृष्ट १० गणेश मूर्ती,
सर्वोत्कृष्ट १० पर्यावरणपूरक गणेश मूर्ती,
सर्वोत्तम थीम आधारित गणपती सजावट: ३ विजेते

फोटो आणि व्हिडिओ पाठवण्यासाठी मार्गदर्शक सूचना:

व्हिडिओचा कालावधी:
व्हिडिओ किमान ३० सेकंद आणि कमाल १ ते २ मिनिटांचा असावा.

शूटिंग मोड: मोबाईलवरून शूटिंग करताना फोन उभा (व्हर्टिकल) ठेवणे अनिवार्य आहे. आडवे (हॉरिझॉन्टल) व्हिडिओ स्वीकारले जाणार नाहीत.

पाठवण्याची पद्धत: फोटो आणि व्हिडिओ नोंदणीकृत व्हॉट्सॲप नंबर किंवा ई-मेलद्वारे पाठवावेत.

प्रवेशिकेसोबत पाठवायचा तपशील:
सजावट थीमचे नाव:
पर्यावरणपूरक सजावट (होय / नाही)
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती (होय / नाही)
सहभागीचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि पत्ता

विजेत्यांची निवड प्रक्रिया:
पाच तज्ञ परीक्षकांचे पॅनेल विविध निकषांच्या आधारे निष्पक्षपणे विजेत्यांची निवड करेल.

परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. या स्पर्धेत कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक मतदान होणार नाही. ही स्पर्धा केवळ मुंबई आणि ठाणे पुरतीच मर्यादित असेल.

सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा👉 Ganpati Mumbai Samachar – Ganpati Contest

Related Articles

Back to top button