मुंबई

पालिका कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये बोनस द्याम्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी…

मुंबई: मुंबई महापालिकेतील कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ४० हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे. या मागणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी महापालिका प्रशासनासोबत संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना याबाबत पत्र दिले आहे. महापालिकेतील सर्व कामगार, कर्मचारी आणि अधिकारी तसेच आरोग्य खात्यातील आरोग्य सेविका, बहुउद्देशीय कामगार, आरसीएच-२, मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, एनयूएचएम/डीएस एन्टरप्रायझेसमधील कर्मचारी आणि कामगार, प्लाझ्मा सेंटरमधील कर्मचारी तसेच कंत्राटी कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बोनस देण्यात यावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

सानुग्रह अनुदान हा संबंधित कामगार-कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याचे संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे बोनसच्या रकमेबाबत तसेच त्याच्या वितरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी प्रशासन आणि कामगार संघटनेची संयुक्त बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button