मुंबई

मुंबई लोकलचा प्रवास होणार महाग; UPI द्वारे पास आणि तिकीट काढणाऱ्यांना बसणार अतिरिक्त भुर्दंड

मुंबई: मुंबईकरांची ‘लाइफलाईन’ मानली जाणारी मुंबई लोकल लवकरच सर्वसामान्यांच्या खिशाला अधिक जड ठरण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाकडून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या तिकिट आणि पास खरेदीवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणाऱ्या या नियमांमुळे मासिक, त्रैमासिक व इतर दीर्घ मुदतीचे पास खरेदी करणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात वाढ होणार आहे.

काय आहे नवा नियम?

नव्या नियमानुसार, UPI द्वारे ₹2,000 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे तिकीट अथवा पास खरेदी केल्यास त्यावर ₹5 मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारला जाईल. या ₹5 वर 18% जीएसटी लागू होणार असल्याने प्रवाशांना एकूण ₹5.90 अतिरिक्त भरावे लागतील. हा नियम उपनगरीय लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे तिकिटांनाही लागू असेल.

कोणाला बसणार सर्वाधिक फटका?

या निर्णयाचा मोठा फटका प्रामुख्याने एसी लोकल आणि प्रथम श्रेणीने (First Class) प्रवास करणाऱ्या पासधारकांना बसणार आहे, कारण या श्रेणीतील पासचे दर सहजपणे ₹2,000 चा टप्पा ओलांडतात.

चर्चगेट ते विरार: एका महिन्याचा एसी लोकल पास जो सध्या ₹2,205 आहे, तो आता ₹2,210.90 इतका होईल.
सीएसएमटी ते कल्याण: एका महिन्याचा एसी पास ₹2,340 वरून वाढून ₹2,345.90 होईल.

रोख रकमेवर सूट, ऑनलाइनवर भुर्दंड

तिकीट खिडकीवर (UTS काउंटर) जाऊन थेट रोख रकमेद्वारे (Cash) व्यवहार करणाऱ्या प्रवाशांना हे अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र, खिडकीवर UPI स्कॅनर वापरून किंवा रेल्वेच्या ऑनलाइन ॲपद्वारे ₹2,000 पेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या सर्व प्रवाशांना हा नवा MDR आणि जीएसटी भरावा लागेल.

Related Articles

Back to top button