उद्या रविवार, रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक; लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे.

मुंबई : उद्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकदरम्यान तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत यामध्ये रेल्वेरुळ, सिग्नल यंत्रणा आणि अन्य तांत्रिक कामांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येईल तर काही फेऱ्या उशिराने धावण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी–विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावरील पनवेल–वाशी, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली–राम मंदिरदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वे : सीएसएमटी–विद्याविहार
मध्य रेल्वेच्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत ब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, लोकल ट्रेन उशिराने धावतील.
हार्बर मार्ग : पनवेल–वाशी
पनवेल ते वाशीदरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सीएसएमटी–बेलापूर/पनवेल आणि ठाणे–पनवेलदरम्यान धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द राहतील. मात्र, ब्लॉकच्या काळात सीएसएमटी–वाशी आणि ठाणे–वाशी दरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार आहे.
पश्चिम रेल्वे : बोरिवली–राम मंदिर
पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते राम मंदिरदरम्यान अप जलद मार्ग आणि पाचव्या मार्गिकेवर सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान बोरिवली–अंधेरीदरम्यान अप जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच पाचव्या मार्गिकेवरील गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
तर उद्या ४ ऑक्टोबर ला शिवसेना उबाठा आणि मनसेचा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्तां ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात गर्जना मोर्चा महापालिका मुख्यालयासमोर आयोजित करण्यात आला आहे.या मोर्चाला येणाऱ्या सुविधा व्हावी यासाठी मनसे आणि शिवसेना उबाठा कडून हा मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली जात आहे.



