महाराष्ट्रमुंबई

१७ वर्षांनंतरही मुंबई-गोवा महामार्ग रखडलेले, खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर, अपघातात शेकडोंचा बळी

​मुंबई,: मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन सातारा वर्षे झाली तरी अपूर्णच आहे.यामुळे कामाच्या खर्चात कामात वाढ झाली आहेम मुंबई गोवा जोडणाऱ्या या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या चौपदरीकरणाला मंजुरी मिळून १७ वर्षे उलटली तरी हा प्रकल्प अद्यापही रखडलेले आहे.माहिती अधिकारातून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, या विलंबाच्या कारभारामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल ५,५०० कोटींनी वाढला आहे. एकीकडे हा महामार्ग कोकणवासीयांसाठी जीवघेणा ठरत असून अपघातातील मृत्यूंचा आकडा वाढतोय, तर दुसरीकडे गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या काळात लाखो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

​खर्चात ४८ टक्क्यांची प्रचंड वाढ :

‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशन’चे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी मागितलेल्या आरटीआय मधून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने उत्तर दिले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील एन एच-६६ च्या ३५५ किमीच्या चौपदरीकरणाच्या १० पॅकेजची मूळ मंजूर किंमत ११,४०९.१४ कोटी होती. ती आता वाढून १६,९०९.२२ कोटींवर पोहोचली आहे. म्हणजेच एकूण खर्चात ४८ टक्के वाढ झाली आहे.​आतापर्यंत यावर ११,५७७ कोटी खर्च झाले असून, हा खर्च संपूर्ण प्रकल्पाच्या मूळ मंजूर अर्थसंकल्पापेक्षाही अधिक आहे. असे असूनही महामार्गाचे अनेक ठिकाणचे काम अजूनही पूर्णत्वास गेले नाही.

चिपळूण-रत्नागिरी परिसरातील परशुराम घाट ते आरावली या एकाच पॅकेजचा खर्च ९८३ कोटींवरून थेट २,२२६ कोटींवर पोहोचला आहे. सर्व १० पॅकेजपैकी या एका पॅकेजच्या खर्चात तब्बल १२६ टक्के वाढ झाली आहे.

​समृद्धी महामार्ग अवघ्या ७ वर्षांत, मग मुंबई-गोवा का रेंगाळला?

महाराष्ट्रात ७०१ किमी लांबीचा पूर्णपणे नवीन ‘समृद्धी महामार्ग’ अवघ्या सात वर्षांत उभारून पूर्ण झाला. मात्र, आधीपासून अस्तित्वात असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला १५ ते १७ वर्षे उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. असा सवाल कोकणवासीयाकडून केला जात आहे

​गणेशोत्सवात कोकणवासीयांचे हाल :

मुंबईत राहणारे लाखो कोकणवासीय दरवर्षी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जातात. सामान्यतः ७ तासांत पूर्ण होणारा प्रवास खड्डे, अपूर्ण पूल आणि एकेरी वाहतुकीमुळे १२ ते १५ तासांहून अधिक लांबतो. अपूर्ण रस्त्यांमुळे होणाऱ्या भीषण अपघातांमध्ये दरवर्षी शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे.

​प्रकल्पाच्या रेंगाळलेल्या कारभारावर आणि अफाट खर्चवाढीवर द यंग व्हिसलब्लोअर्स फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.​”सरकारने कोणतीही जबाबदारी निश्चित न करता कोकणाची जीवनवाहिनी असलेल्या या महामार्गाकडे सतत खर्चवाढीसाठी ‘एटीएम’ म्हणून पाहिले आहे. पनवेल-इंदापूर या टप्प्याचे काम एनएचएआय करत असताना उर्वरित भागाची जबाबदारी राज्य पीडब्ल्यूडी कडे देण्यात आली आहे. कामाची जबाबदारी आणि आर्थिक प्रशासन वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये विभागल्याचे कारण देऊन कोकणातील जनतेला अपघातातील मृत्यू, वाहतूक कोंडी आणि या यातना सोसण्यास भाग पाडले जात आहे. हजारो कोटी रुपये खर्चूनही प्रकल्प १५ वर्षे अपूर्ण राहिला असेल, तर या अभूतपूर्व विलंबासाठी अखेर जबाबदार कोण, याचे उत्तर सरकारने दिलेच पाहिजे,” असे प्रतिक्रिया जितेंद्र घाडगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button