मुंबई

गर्जना सभेला विलंब,नेते पदाधिकारी, कार्यकर्ते जमा व्हायला वेळ लागणार

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ‘गर्जना’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी मुंबई महापालिका मुख्यालयासमोर हे आंदोलन होणार असून, या आंदोलनात विविध विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.

सकाळी दहा वाजता मेट्रो स्थानकापासून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर महापालिका मुख्यालयासमोर सभा होणार आहे. आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असली, तरी साडेदहा वाजून गेले तरी मोर्चाला सुरुवात झालेली नाही. तसेच अद्याप कोणतेही प्रमुख नेते आंदोलनस्थळी दाखल झालेले नसल्याचे चित्र आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आंदोलनस्थळावरील घडामोडींची क्षणाक्षणाची माहिती घेत पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे. मोर्चाला नेमकी कधी सुरुवात होते आणि प्रमुख नेते कधी दाखल होतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button