मुंबई

अबब! मातोश्रीवर खरंच नोटीस ; सतीश सालियन आदित्य ठाकरेंना देणार

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांच्या जबाबाच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर अली आहे. एफआयआर मध्ये अनेक नावांचा उल्लेख आहे, ज्यात माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या नावाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.सदर प्रकरण एका वेगळ्या वळणावर जातांना दिसत आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन कायदेशीर टीम सोबत आज आदित्य ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या “मातोश्री “येथे जाऊन आदित्य ठाकरे यांना नोटीस बजावणार आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दिशा सालियन प्रकरण वक्तव्या संदर्भातील नोटीसित उल्लेख करण्यात आला आहे. तब्बल 500 कोटींचा आब्रू नुकसानीचा दावा सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यावर ठोकला आहे. सदर नोटीस आपण थेट मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांना द्यायला जात असून पोलिसांनी आमच्या कायदेशीर टीमला संरक्षण द्यावेत अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले होतें की, दिशाला मी कधीही भेटलो नाही, तिच्या मृत्यू प्रकरणाशी माझं नाव जोडणे हा चुकीच्या प्रचार मोहिमेचा भाग आहे.त्यानंतर नोटीस अली असल्याचे समोर आले. दिवंगत दिशा सालियन ही सेलिब्रिटी मॅनेजर होती.सात दिवसात अनिल देशमुख आणि आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य मागे घ्यावा माफी मागावी अशा प्रकारची मागणी नोटीस मध्ये करण्यात अली आहे

आदित्य ठाकरे यांचं नेमकं ट्विट काय?
मी दिशा सालियन ह्यांना कधीही भेटलेलो नाही किंवा त्यांच्याशी माझी ओळखही नव्हती.
राजकीय हेतूने, वैयक्तिक द्वेषापायी, चारित्र्यहनन करण्याच्या हेतूने काही लोकांकडून गेल्या ६ वर्षांपासून वारंवार ह्या दुर्दैवी घटनेशी कुठलाही पुरावा वा संबंध नसतानाही माझं नाव जोडण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न सुरु आहे.

कुठलंही तथ्य आणि सत्य नसलेलं हे सततचं खोटं कॅंपेन दुर्दैवी आहे. बोंबाबोंब करुन केल्या जाणाऱ्या टिव्ही चॅनल्सवरच्या खोट्या चर्चा आणि मिडिया ट्रायल्स सत्य बदलू शकत नाहीत. अधिकृत यंत्रणांना कुठल्याही व्यत्ययाशिवाय, राजकीय हस्तक्षेपाशिवाय, चारित्र्यहननाशिवाय आणि निःपक्षपातीपणे पुन्हा एकदा नव्याने ही चौकशी करु द्या.

परत एकदा सांगतो, ज्यांना वाटत असेल की अश्या चारित्र्यहननाच्या आणि खोट्या प्रचाराच्या मार्गाने तुम्ही आम्हाला शांत बसवू शकाल तर तो तुमचा भ्रम आहे.

दिशा सालियन प्रकरणी काय बोलावं? काय सांगावे? पुराव्या अभावी काही वक्तव्य करू नये. जोपर्यंत आपल्याकडे सबळ पुरावे नाहीत आणि एखादी गोष्ट माहित नाही तोपर्यंत आपण बोलू नये अशा पद्धतीची भूमिका आपली असावी असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी
यांनी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी,नेत्यांचे कान टोचले आहे.

शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेले “मातोश्री”.सतीश सालियन मातोश्रीवर दाखल होणार का? पोलिसांची नेमकी भूमिका काय असणार आहे.शिवसैनिक याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Related Articles

Back to top button