मुंबई

लंडनचे यश खुपते, म्हणून पोटात दुखते…. व्यंगचित्रातून उद्धव ठाकरे यांना टार्गेट

मुंबई : सध्याच्या काळात सोशल मीडिया हे माध्यम सर्व सामान्यांना व्यक्त होण्याचं मोठं शस्त्र बनलं आहे. सोशल मीडियाचा वापर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विरोधकांवर टीका करण्यासाठी करतात. यापूर्वी व्यंगचित्राच्या माध्यमातून अशा प्रकारची टीका पाहायला मिळत होती. आता ट्रेंड बदलला असून व्यंगचित्रच सोशल मीडियावर पोस्ट केले जात.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इंग्लंड वारीवरून ठाकरे सेनेकडून खिल्ली उडवली होती, त्याला शिंदे शिवसेनेकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून ठाकरे शिवसेनेला सडेतोड उत्तर दिले आहे.

शिवसेनेच्या सोशल मीडिया खात्यावरून शेअर करण्यात आलेल्या या मार्मिक व्यंगचित्रात टीव्हीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यशाची बातमी सुरू असल्याचे दाखवले आहे. ‘ब्रेकिंग न्यूज: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लंडनमध्ये ३ पुरस्कारांनी सन्मान!’ अशी बातमी टीव्ही स्क्रीनवर झळकत आहे. ही बातमी पाहताच उद्धव ठाकरे यांच्या पोटात तीव्र कळा येत असून ते हतबल होऊन टीव्ही बंद करण्यासाठी सांगत आहेत, असे या चित्रात रेखाटण्यात आले आहे.

“बंद कर तो टीव्ही, पोटात कळ मारते माझ्या ह्यांची प्रगती बघून!” असा संताप आणि मळमळ व्यक्त करणारा संवाद या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे यांच्या तोंडी देण्यात आला आहे. यातून ‘शिंदेंचे यश पाहून विरोधकांच्या पोटात कसे दुखत आहे’ असा थेट आणि बोचरा वार शिवसेनेने केला आहे.

ठाकरे सेनेचे उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या त्यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती.त व्यंगचित्राच्या माध्यमातून दुसऱ्याची प्रगती आणि यश न पचल्याने विरोधकांना कशी ‘राजकीय पोटदुखी’ जडली आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button