मुंबई

इंडिगोचा हवाई प्रवास महागला

मुंबई: देशातील महत्वाची हवाई सेवा देणारी मोठी कंपनी इंडिगो एअरलाईन्सने आपल्या काही सेवा शुल्कात वाढ केली आहे.

अतिरिक्त आणि पर्यायी सेवांमध्ये अधिक समान,लहान मुलांच्या तिकिटांच्या किंमतीत वाढ, प्राध्यान्य बोर्डिंग यात वाढ केल्याने प्रवाश्यांना अधिकचे पैसे द्यावे लागणार आहे.

प्रवाशांनी प्रवासात मर्यादेपेक्षा अधिक सामान नेले तर इंडिगो आता प्रतिकिलो आकारले जाणारे ७०० रुपयांवरून ८०० रुपये केले आहे. तीन दिवसाच्या तान्ह्या बाळापासून ते दोन वर्षे वयोगटातील लहान मुलांना वेगळी सीट मिळत नाही परंतु त्यांच्यासाठी वेगळे तिकीट काढणे अनिवार्य आहे.ह्या लहान मुलांच्या प्री बुकिंगचे शुल्क २५०० रुपये केले आहे.विमानतळावरून तिकीट घेतल्यास तीन हजार रुपये करण्यात आले आहे.तसेच प्रौढ व्यक्तींशिवाय एकट्याने देशांतर्गत प्रवास करणाऱ्या मुलांसाठीच शुल्क ५००० हजार रुपयांवरून ५९९९ रुपये करण्यात आले म्हणजे ९९९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ही शुल्क १२ हजार ९९९ रुपये करण्यात आले आहे.चेख इन आणि बोर्डिंगची सुविधा देणाऱ्या ‘फास्ट फॉरवर्ड ‘ सेवेसाठी दर वाढवण्यात आले आहेत. देशांतर्गत विमानांसाठी आता ६५० रुपये तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ८५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

प्रवास प्रमाणपत्राच्या साठी असलेल्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे दोनशे रुपयांवरून तीनशे रुपये हे शुल्क करण्यात आले आहे. ही वाढ व विमान तिकीट आणि नियमित समान मर्यादेच्या पेक्षा वेगळी आहे त्यामुळे अतिरिक्त सेवाचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांच्या प्रवास खर्चात वाढ होणार आहे.

Related Articles

Back to top button