मुंबई

साहिल वाकोडे प्रकरणी IIT मुंबईसमोर आंदोलन; सुजात आंबेडकरांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा, तसेच या प्रकरणी IIT मुंबई प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीप्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने IIT मुंबईसमोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनामागील भूमिका जाणून घेतली.

साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि संबंधितांना जाब विचारण्यात यावा, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली. IIT मुंबईच्या डीनसह प्रशासनाने या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत निषेध नोंदवला. साहिल वाकोडे यांना न्याय मिळावा, त्यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर IIT मुंबई प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले.

आंदोलनस्थळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button