मुंबई

IIT Bombay परिसरात विद्यार्थ्याची आत्महत्या, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनि रस्त्यावर उतरून केलं आंदोलन

मुंबई: देशातील सर्वोच्च शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईच्या (IIT Bombay) पवई कॅम्पसमध्ये शुक्रवारी संध्याकाळी . बी.टेकच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. साहिलचा मृतदेह आढळल्यानंतर कॅम्पसमध्ये एकच खळबळ उडाली, संतप्त विद्यार्थ्यांनी रात्री रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले.



साहिल एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमा करत होता .वसतिगृहातील खोलीत त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. यंदाच्या वर्षातील विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही तिसरी घटना असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

विद्यार्थ्यांचा आरोप

आंदोलक विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्याथ्याला परीक्षेदरम्यान दुसऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत डोकावत पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला परीक्षा कक्षातून बाहेर काढण्यात आले तसेच निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कार होऊ शकते, अशी समज देण्यात आली. या प्रकारान वसतिगृहातील खोलीत परतलेल्या विद्यार्थ्याने सायंकाळी टोकाने पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच विद्याथ्य प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत न्यायाची मागणी केली आणि संस्थेच्या संचालकांनी प्रत्यक्ष संवाद साधावा, असा आग्रह धरला.

प्रशासनाचे स्पष्टीकरण

दरम्यान, आयआयटी मुंबई प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात वेगळी माहिती समोर आली आहे. प्रशासनानुसार संबंधित विद्यार्थी परीक्षेदरम्यान मोबाइलचा वापर करताना आढळला होता आणि त्याने प्रश्नपत्रिका ‘चॅटजीपीटी’वर (ChatGPT) अपलोड केली होती. त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नव्हती. संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले होते तसेच शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. विद्यार्थ्याच्या निधनाबद्दल आयआयटी मुंबईने तीव्र दुःख व्यक्त केले असून त्याच्या वर्गमित्रांना व कुटुंबीयांना आवश्यक ते सहकार्य पुरवले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button