मुंबई
राज्यपालांच्या गणरायाचे कृत्रिम हौदात विसर्जन; मातीत कडुलिंबाचे रोप लावणार

मुंबई : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या निवासस्थानी बसवलेल्या पाच दिवसांच्या गणरायाचे शुक्रवारी (दि. १८) लोकभवन येथे फुलांनी सजवलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे राज्यपाल मुंबईबाहेर असल्यामुळे लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी गणरायाची आरती केली व बाप्पाला निरोप दिला.
राज्यपालांच्या सूचनेनुसार गणेश मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता निवासस्थानाबाहेर कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
राज्यपालांच्या निवासस्थानी मांडलेली श्रींची मूर्ती पर्यावरण स्नेही शाडूची होती. विसर्जित मूर्तीच्या मातीमध्ये कडुलिंबाचे रोप लावण्यात येणार आहे.
विसर्जनाचे वेळी राज्यपालांचे सहसचिव एस रामामुर्ती, परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे, जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



