मुंबई

महामुंबईत गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप.

मुंबई: गेल्या सहा दिवसांपासून राज्यभरात गणेशोत्सव आणि गौरीच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झालं होत. सहा दिवस गणपती आणि त्यातच तीन दिवस लाडका गणपती बाप्पा
यांच्या सहवासाने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. तीन दिवस माहेरी आलेल्या गौरींना आणि गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

मुंबई शहर व उपनगरांत आज सकाळी सहा वाजेपर्यंत ३०५ सार्वजनिक गणेश मंडळाचे गणपती,३८,४४३८ घरगुती गणपती, ५५१८ गौरी मूर्ती असे एकूण ४४२६५ विसर्जन झाले. यादरम्यान महापालिका अधिकारी कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्त तैनात असल्याने कुठेही अनुचित प्रकार किंवा घटना घडली नाही.

ठाणे जिल्ह्यात ११ हजाराहून अधिक गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
रायगड जिल्ह्यात ५६ हजार ३८३,
पालघर जिल्ह्यात १,८४९ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
नैसर्गिक जलस्रोत तसेच पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन सोहळा सर्वत्र पार पडला.
“गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या”
जयघोष करत असताना भाविकांचा कंठ दाटून आला होता.अनेक ठिकाणी यावेळी वरुण राजानेही हजेरी लावली होती.

Related Articles

Back to top button