मुंबई

पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन शांततेत

मुंबई: मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. काल पाच दिवसाच्या गणपतीचे शांततेत विसर्जन झाले . राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरेने गणपतीची स्थापना झाल्यानंतर विसर्जन होते काही ठिकाणी दीड दिवसाचा काही ठिकाणी पाच दिवसाचा सात दिवसाचा नऊ दिवसाचा दहा दिवसाचा अशा प्रकारे गणपतीची स्थापना केल्या जाते काल पाचव्या दिवशी मुंबईत शांततेत गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत समुद्रकिनारी खाडी नैसर्गिक तलाव तसेच कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.

सर्वजनिक गणेश मंडळ विसर्जन एकूण- ६६२
घरगुती गणेश विसर्जन मूर्ती – ३१६४७
हरतालिका – ३६
एकूण = ३२३४५

मुंबईत दीड दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जन सोहळा सुरळीतपणे पार पडला. 16 सप्टेंबर रोजी मिळालेल्या अहवालानुसार मुंबईत एकूण 61 हजार 528 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.

यामध्ये सार्वजनिक गणेशमूर्ती 301, तर घरगुती गणेशमूर्ती 61 हजार 135 इतक्या मूर्तींचे विसर्जन झाले. याशिवाय 92 हरितालिका मूर्तींचेही विसर्जन करण्यात आले.

दीड दिवसांच्या विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्याची नोंद नाही. विसर्जन प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकूण विसर्जन : 61,528
सार्वजनिक : 301
घरगुती : 61,135
हरितालिका : 92

एकूण दीड आणि पाच दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जन आकडा बघितला तर अशी होती .

९३ हजार ९७३ इतका होती.
यात सार्वजनिक मंडळे ९६३ इतकी
घरगुती ९२ हजार ७८२ इतक्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले..

गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी मुंबई महानगर पालिका,मुंबई पोलिस समुद्र आणि तलाव परिसरात जीवरक्षक तैनात असल्याने कुठेही विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही

Related Articles

Back to top button