महाराष्ट्रमुंबई

दहावी बारावीच्या परीक्षेचा वेळापत्रक जाहीर,

मुंबई/पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची लेखी परीक्षा सोमवार ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहे तर दहावीची लेखी परीक्षा सोमवार १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान घेण्यात येणार आहे.तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक,श्रेणी,तोंडी व मूल्यमापन परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात येतील. विषयानुसार अंतिम सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून याची खात्री करून घ्यावी असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या राज्यातील पुणे, नागपूर,छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत

Related Articles

Back to top button