मुंबई

मुंबईतील एप्पल स्टोर वर ग्राहकांची गर्दी

मुंबई : आयफोन एटीन प्रो आणि आयफोन एटीन प्रो मॅक्सच्या अधिकृत विक्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईसह देशभरात या नव्या आयफोन खरेदी करणाऱ्यांची पाऊले एप्पल स्टोर कडे वळतांना दिसत आहे. मुंबई,दिल्ली आणि बंगरूळ येथील अधिकृत “एप्पल स्टोर”दुकानांसमोर ग्राहकांनी गर्दी केली आहे.

काल रात्रीपासूनच मुंबईतील जीओ वर्ल्ड सेंटर येथील एप्पल स्टोअर बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या होत्या. ग्राहकांमध्ये तरुण तरुणींचा समावेश मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आपला फोन अपग्रेड राहावं यासाठी आम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे ग्राहक सांगत आहे. नाशिकहून आलेल्या हितेशने सांगितलं की मी गुरुवारी रात्री 10 वाजता रांगेत उभा आहे. सकाळी आठ वाजता पहिला स्लॉट मला मिळाला आहे. त्यानंतर मला फोन मिळणार आहे.18 प्रो मॅक्स घेण्याचं कारण सांगताना हितेश म्हणाला की यातील कॅमेरा आणि प्रोसेस मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. माझ्याकडे आता आयफोन 17 प्रो आहे. आता आयफोन एटीन प्रो खरेदी करणार आहे याचा मला खूप आनंद आहे.

Related Articles

Back to top button