मुंबई

कोस्टल रोडवर भरधाव वेगात जाणाऱ्या BMW चा भयंकर अपघात,३ जणांचा मृत्यू,१ गंभीर जखमी.

मुंबई: आज सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान कोस्टल रोडवरून भरधाव वेगात जाणाऱ्या BMW मार्च अपघात झाला यात तीन जणांचा मृत्यू झाला एक जण गंभीर जखमी आहे.हा अपघात इतका भयानक आहे की कोस्टल रोडच्या लोटस जेट्टी जवळ पुलावरून ही कार दीडशे फूट खोल काम सुरू असलेल्या ठिकाणी कोसळली.

आज सकाळी काळया रंगाची बी एम डब्ल्यू मोटार कार जिचा नंबर डी डी 01 सी 6302 ही मरिन ड्राईव्ह कडुन हाजी अलीच्या दिशेने जात भरधाव वेगात जात होती.कोस्टल रोड वरील लाला कॉलेज समोर आणि लोटस जेट्टी जवळ आल्यानंतर कोस्टल रोडच्या उत्तर वाहिनी वरुन प्रवासा दरम्यान कोस्टल रोडच्या ब्रिजच्या कठड्यावरून कार पार्कीगचे काम चालु असलेल्या परिसरात वरुन खाली पडली.



सदर अपघातात कार मधील चार जण जखमी झाले त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केले त्यातील तीन जण मृत्यू झाल्याचे नायर रुग्णालयातील वैदयकीय अधिकारी यांनी घोषीत केलेले आहे. तसेच एक जण जखमी असुन, त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत व्यक्तीचे नाव
मृतांची ओळख धैर्य दर्शन शेठ (१७), आदित्य जकसानिया (१९) आणि शनाय गज्जर (२१) अशी पटली आहे.

तर आदित्य कल्पेश्वर ओसवाल (२३) जखमी आहे.

घटनास्थळी ताडदेव पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथक उपस्थित असून सदर घटनेबाबत पुढील चौकशी चालू आहे.

Related Articles

Back to top button