मुंबई

मध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर धडक रावजी६,७८२ जणांवर कारवाई, ३४ लाखांचा दंड वसूल

मुंबई: मध्य रेल्वेया वतीने फुलत्या किंवा अधिकृत तिकीट न काढणाऱ्या प्रवाश्यांविरोधात मोहीम राबविली आहे.मुंबईतील मध्यरेल्वेच्या विविध स्थानकांवर तसेच धावत्या रेल्वेत थेट कारवाही सुरू केली आहे. या कारवाहीत विनातिकीट आणि अधिकृत तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या तब्बल ६,७८२ प्रवाशांवर कारवाई केली आहे फुकट्या प्रवाशांकडून एकूण ३४ कोटी रुपये दंड बसूल केला आहे. मुख्य मार्ग, हार्बर मार्ग तसेच मेल एक्सप्रेस गाड्यांत जाऊन ही कारवाही केली यात प्रवासात शिस्त राखण्यासाठी तिकीट तपासणी पथकांनी व्यापक मोहीम राबवली. मध्य रेल्वेवरील डोंबिवली, कल्याण, ठाणे, दादर, कुर्ला, नेरूळ, पनवेल, बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, लोणावळा, भिवंडी आणि दिवा या स्थानकावर २१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. कसारा आणि कर्जत-खोपोली दिशेकडे जाणाऱ्या मार्गावरील लोकलमध्ये, स्थानकात विनातिकीट दंड वसुली करण्यात आली आहे.

मध्य रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवासी शोधण्यासाठी एक धोरण अवलंबले आहे. ज्यामध्ये स्थानक तपासणी, अचानक घाड तपासणी (अम्बुश तपासणी), तटबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमा यांचा समावेश आहे. ही कार्यवाही सर्व विभागांमध्ये मेल/एक्स्प्रेस, विशेष रेल्वेगाड्या तसेच मुंबई विभागातील उपनगरी गाड्यांमध्ये केली जाते, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली. मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन केले असून विनातिकीट आणि नियमबाच्या प्रवास करणायांविरोधातील विशेष मोहिमा पुढेही सुरू राहतील, असा रेल्वे जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button