मुंबई

मध्य रेल्वेवर उद्या रविवारी मेगाब्लॉक

ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक लोकल ट्रेन,मेलएक्सप्रेसचे वेळापत्रक कोलमडणार

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर उद्या रविवारी सकाळी ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर मध्य रेल्वेवर ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे.तर मेन / हार्बर / ट्रान्स-हार्बर आणि पोर्ट मार्गांवर कोणताही ‘मेगा ब्लॉक’ असणार नाही ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या उपनगरीय मार्गावरील ५व्या व ६व्या मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी ‘मेगा ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या व ६व्या मार्गावर सकाळी ०९.०० ते दुपारी १.०० या वेळेत हा ब्लॉक असणार.

मेल/एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल:

‘डाऊन’ दिशेच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावरून वळवण्यात येतील आणि ब्लॉक कालावधीत त्या नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा चालवण्यात येतील:
गाडी क्रमांक 11029 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस
गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर गोदान एक्सप्रेस
गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर एक्सप्रेस आणि
गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस

तर ‘अप’ दिशेच्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ‘अप’ जलद मार्गावरून वळवण्यात येतील आणि ब्लॉक कालावधीत त्या आपल्या गंतव्यस्थानी १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील:
गाडी क्रमांक 22226 सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
गाडी क्रमांक 11010 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12126 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12134 मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 13201 राजगीर – लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस
गाडी क्रमांक 17221 काकीनाडा पोर्ट – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12168 बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
गाडी क्रमांक 12321 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मेल
गाडी क्रमांक 12812 हतिया – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
गाडी क्रमांक 17611 नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस आणि
गाडी क्रमांक 22160 चेन्नई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस

मेमू सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन / ओरिजिनेशन
वसई रोड स्थानकावरून सकाळी ०९.५० वाजता सुटणारी गाडी क्रमांक 61003 वसई रोड – दिवा मेमू कोपर स्थानक येथेच शॉर्ट टर्मिनेट होईल.
दिवा स्थानकावरून सकाळी ११.३० वाजता सुटणारी गाडी क्रमांक 61004 दिवा – वसई रोड मेमू कोपर स्थानक येथून सकाळी ११.४५ वाजता शॉर्ट ओरिजिनेट होईल. दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान मेमू सेवा रद्द राहील.

मेन, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि पोर्ट लाईन्सवर कोणताही ‘मेगा ब्लॉक’ नाही
मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विभाग आणि हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल विभाग (ज्यामध्ये ट्रान्स-हार्बर लाईन आणि बेलापूर-उरण पोर्ट लाईनचाही समावेश आहे) येथे कोणताही ‘मेगा ब्लॉक’ घेतला जाणार नाही.

पश्चिम रेल्वेवर आज रात्री ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री सांताक्रुझ आणि माहीम स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप फास्ट जलद मार्गावर रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत तसेच डाऊन जलद मार्गावर रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक असेल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले.

Related Articles

Back to top button