मालवाहतुकीतून मध्य रेल्वेची ३४०० कोटींहून अधिक कमाई

एप्रिल ते ऑगस्टदरम्यान १३,०५८ रेकद्वारे ३४.४८ दशलक्ष टन मालाची वाहतूक; गतवर्षीच्या तुलनेत टनभारात ७ टक्क्यांहून अधिक वाढ
मुंबई : मालवाहतुकीच्या क्षेत्रात मध्य रेल्वेने दमदार कामगिरी नोंदवली असून, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत १३,०५८ रेकद्वारे तब्बल ३४.४८ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. यातून मध्य रेल्वेला ३,४६१.९२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी याच कालावधीत १२,३६९ रेकद्वारे ३२.१० दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली होती. त्यामुळे यंदा मालवाहतुकीच्या टनभारात ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, रेकच्या संख्येतही ६८९ ने वाढ झाली आहे.
मालवाहतुकीत नागपूर विभागाचा सर्वाधिक वाटा राहिला. एकूण ३४.४८ दशलक्ष टन मालवाहतुकीपैकी नागपूर विभागाने २०.३१ दशलक्ष टन म्हणजेच ५८.९० टक्के मालाची वाहतूक केली. त्यापाठोपाठ मुंबई विभागाने ८.५६ दशलक्ष टन म्हणजेच २४.८३ टक्के मालवाहतूक केली. महसुलाच्या बाबतीतही नागपूर विभाग आघाडीवर असून, त्याने २,०७२.७३ कोटी रुपये म्हणजेच एकूण महसुलाच्या ५९.८७ टक्के उत्पन्न मिळवले. मुंबई विभागाचा महसूल ८००.४९ कोटी रुपये म्हणजे २३.१२ टक्के आहे.
मालाच्या प्रकारानुसार कोळशाची वाहतूक सर्वाधिक झाली. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान ४,२९१ रेकद्वारे १७ दशलक्ष टन कोळशाची वाहतूक झाली असून, त्यातून १,५५६.८७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यानंतर कंटेनरद्वारे ४.३३ दशलक्ष टन, पेट्रोलियम उत्पादनांची २.९१ दशलक्ष टन आणि सिमेंटची २.८२ दशलक्ष टन वाहतूक झाली. लोखंड-पोलाद, लोहखनिज, खते तसेच अन्नधान्य, वाहने, क्लिंकर, साखर, कांदा आणि अन्य मालाचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
ऑटोमोबाईल वाहतुकीतही वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ दरम्यान ४५१ रेकद्वारे वाहनांची वाहतूक करण्यात आली.मालवाहतुकीतून मध्य रेल्वेची ३४०० कोटींहून अधिक कमाई
एप्रिल ते ऑगस्टदरम्यान १३,०५८ रेकद्वारे ३४.४८ दशलक्ष टन मालाची वाहतूक; गतवर्षीच्या तुलनेत टनभारात ७ टक्क्यांहून अधिक वाढ
मुंबई : मालवाहतुकीच्या क्षेत्रात मध्य रेल्वेने दमदार कामगिरी नोंदवली असून, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत १३,०५८ रेकद्वारे तब्बल ३४.४८ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. यातून मध्य रेल्वेला ३,४६१.९२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षी याच कालावधीत १२,३६९ रेकद्वारे ३२.१० दशलक्ष टन मालाची वाहतूक झाली होती. त्यामुळे यंदा मालवाहतुकीच्या टनभारात ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, रेकच्या संख्येतही ६८९ ने वाढ झाली आहे.
मालवाहतुकीत नागपूर विभागाचा सर्वाधिक वाटा राहिला. एकूण ३४.४८ दशलक्ष टन मालवाहतुकीपैकी नागपूर विभागाने २०.३१ दशलक्ष टन म्हणजेच ५८.९० टक्के मालाची वाहतूक केली. त्यापाठोपाठ मुंबई विभागाने ८.५६ दशलक्ष टन म्हणजेच २४.८३ टक्के मालवाहतूक केली. महसुलाच्या बाबतीतही नागपूर विभाग आघाडीवर असून, त्याने २,०७२.७३ कोटी रुपये म्हणजेच एकूण महसुलाच्या ५९.८७ टक्के उत्पन्न मिळवले. मुंबई विभागाचा महसूल ८००.४९ कोटी रुपये म्हणजे २३.१२ टक्के आहे.
मालाच्या प्रकारानुसार कोळशाची वाहतूक सर्वाधिक झाली. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान ४,२९१ रेकद्वारे १७ दशलक्ष टन कोळशाची वाहतूक झाली असून, त्यातून १,५५६.८७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. त्यानंतर कंटेनरद्वारे ४.३३ दशलक्ष टन, पेट्रोलियम उत्पादनांची २.९१ दशलक्ष टन आणि सिमेंटची २.८२ दशलक्ष टन वाहतूक झाली. लोखंड-पोलाद, लोहखनिज, खते तसेच अन्नधान्य, वाहने, क्लिंकर, साखर, कांदा आणि अन्य मालाचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
ऑटोमोबाईल वाहतुकीतही वाढ झाली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२६ दरम्यान ४५१ रेकद्वारे वाहनांची वाहतूक करण्यात आली. गतवर्षी याच कालावधीत ३५७ रेक वापरण्यात आले होते. त्यामुळे यंदा ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये ९४ रेकची वाढ झाली आहे.
दरम्यान, ऑगस्ट २०२६ हा मध्य रेल्वेसाठी मालवाहतुकीच्या दृष्टीने विशेष ठरला. गेल्या दहा वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक ६.८५ दशलक्ष टन मालवाहतूक या महिन्यात नोंदवण्यात आली. यासाठी २,५६७ रेक वापरण्यात आले. ऑगस्ट २०२५ मध्ये २,३१५ रेकद्वारे ५.६१ दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती. त्यामुळे यंदा मालवाहतुकीत २२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मध्य रेल्वेला ६८४.७८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून, मागील वर्षीच्या ५८३.६९ कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ १७ टक्क्यांहून अधिक आहे.
ऑगस्टमधील विभागनिहाय कामगिरीत नागपूर विभागाने ४ दशलक्ष टन मालवाहतूक करून ४०४.८६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. मुंबई विभागाने १.७६ दशलक्ष टन मालवाहतूक करत १६५.९५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. सोलापूर विभागाने ०.५६ दशलक्ष टन, भुसावळ विभागाने ०.३४ दशलक्ष टन आणि पुणे विभागाने ०.२० दशलक्ष टन मालवाहतूक केली.
ऑगस्टमध्ये कोळसा, पेट्रोलियम उत्पादने, ऑटोमोबाईल, लोहखनिज, साखर, अन्नधान्य आणि डोलोमाइटच्या लोडिंगमध्येही वाढ झाली. कोळशाचे लोडिंग ५५७ वरून ९०४ रेक, पेट्रोलियम उत्पादनांचे २१४ वरून २४८ रेक आणि ऑटोमोबाईलचे ६९ वरून ८५ रेक झाले.
दरम्यान, ८ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरातमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेएनपीटी येथून इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हद्वारे चालवल्या जाणाऱ्या डबल-स्टॅक लाँग हॉल मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. या उपक्रमामुळे मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, टर्मिनलची क्षमता वाढवणे, मालाची जलद व सुरळीत वाहतूक आणि नवीन मालवाहतूक स्रोत निर्माण करण्यावर मध्य रेल्वेचा भर आहे. ग्राहक-केंद्रित सेवा आणि आधुनिक लॉजिस्टिक्स उपाययोजनांच्या माध्यमातून मालवाहतुकीतील हिस्सा वाढवून भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. गतवर्षी याच कालावधीत ३५७ रेक वापरण्यात आले होते. त्यामुळे यंदा ऑटोमोबाईल लोडिंगमध्ये ९४ रेकची वाढ झाली आहे.
दरम्यान, ऑगस्ट २०२६ हा मध्य रेल्वेसाठी मालवाहतुकीच्या दृष्टीने विशेष ठरला. गेल्या दहा वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील सर्वाधिक ६.८५ दशलक्ष टन मालवाहतूक या महिन्यात नोंदवण्यात आली. यासाठी २,५६७ रेक वापरण्यात आले. ऑगस्ट २०२५ मध्ये २,३१५ रेकद्वारे ५.६१ दशलक्ष टन मालवाहतूक झाली होती. त्यामुळे यंदा मालवाहतुकीत २२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मध्य रेल्वेला ६८४.७८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला असून, मागील वर्षीच्या ५८३.६९ कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ १७ टक्क्यांहून अधिक आहे.
ऑगस्टमधील विभागनिहाय कामगिरीत नागपूर विभागाने ४ दशलक्ष टन मालवाहतूक करून ४०४.८६ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. मुंबई विभागाने १.७६ दशलक्ष टन मालवाहतूक करत १६५.९५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. सोलापूर विभागाने ०.५६ दशलक्ष टन, भुसावळ विभागाने ०.३४ दशलक्ष टन आणि पुणे विभागाने ०.२० दशलक्ष टन मालवाहतूक केली.
ऑगस्टमध्ये कोळसा, पेट्रोलियम उत्पादने, ऑटोमोबाईल, लोहखनिज, साखर, अन्नधान्य आणि डोलोमाइटच्या लोडिंगमध्येही वाढ झाली. कोळशाचे लोडिंग ५५७ वरून ९०४ रेक, पेट्रोलियम उत्पादनांचे २१४ वरून २४८ रेक आणि ऑटोमोबाईलचे ६९ वरून ८५ रेक झाले.
दरम्यान, ८ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरातमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेएनपीटी येथून इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हद्वारे चालवल्या जाणाऱ्या डबल-स्टॅक लाँग हॉल मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. या उपक्रमामुळे मालवाहतुकीच्या क्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, टर्मिनलची क्षमता वाढवणे, मालाची जलद व सुरळीत वाहतूक आणि नवीन मालवाहतूक स्रोत निर्माण करण्यावर मध्य रेल्वेचा भर आहे. ग्राहक-केंद्रित सेवा आणि आधुनिक लॉजिस्टिक्स उपाययोजनांच्या माध्यमातून मालवाहतुकीतील हिस्सा वाढवून भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.