मुंबई

मुंबईत घाणीचे साम्राज्य, तरी पालिका निष्क्रिय

मनोज कुळकर्णी

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांत मुंबई महानगर पालिकेच सफाईकडे दुर्लक्ष झाल्याचं आढळत आहे त्यामुळेच जागोजागी कचरा आणि घाणीचे साम्राज्य आढळते. वारंवार आदेश देऊनही महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांनी या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी काहीच केलेले नाही.स्वच्छतेबाबत महापालिका यंत्रणा निष्क्रिय असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ओढले.

ही परिस्थती सुधारली नाही तर प्रत्येक विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांसह घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाराऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला.कांजूर कचरा क्षेपणभूमी मुळे होणारे प्रदूषण आणि उत्तर समस्यांबाबत विक्रोळीच्या कन्नमवार नगर मधील रहिवाश्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.गुरुवारी न्यामूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यामूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली.यावेळी मुंबई आणि उपनगरातील कचरा पाहून न्यायालयाने प्रचंड संताप व्यक्त केला.कचऱ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून कसे म्हणवून घेणार असा प्रश्न न्यायालयाने केला.यापूर्वीही पालिका अधिकारी हे न्यायालयाला स्थिती सुधारण्याबाबत नुसते आश्वासने देतात, पण स्थानिक पातळीवर परिस्थिती वेगळीच असते.

अशा कचरा असलेल्या ठिकाणी अधिकारी जात नाहीत किंवा तिथला आढावा घेत नाही. त्यांची कारवाई केवळ कागदावरच आहे, असे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने सुनावले. सिंगापूरमध्ये कचरा टाकण्यावर दोन ते १० हजार डॉलरचा दंड आकारला जातो. आपल्याकडेही दंडासह फौजदारी कारवाई करण्याबाबत धोरण आखण्याचा विचार करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.मुंबईतील विविध ठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शक कार्यपद्धती आवश्यक आहे. त्यामुळे, सार्वजनिक रस्त्यांवरील स्वच्छता व आरोग्याची जबाबदारी. असलेल्या २६ प्रभागांमधील सर्व अधिकाऱ्यांची यादी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. रस्त्यावर कुठेही कचरा किंवा घाण दिसल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

Related Articles

Back to top button