भांडुपमध्ये प्रतिबंधित गुटखा-सुगंधित सुपारीचा साठा जप्त; १ कोटी १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
मुंबई : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित सुपारीची वाहतूक व विक्री करणाऱ्या टोळीविरोधात भांडुप पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एकूण १ कोटी १८ लाख २९ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास भांडुप पोलिस करत आहेत.पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की नाहूर परिसरात अवैध गुटख्याचा साठा आहे.
भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित गुटखा व सुगंधित सुपारीच्या वाहतुकीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड व पथकाला कारवाईसाठी रवाना करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.२५ वाजता भांडुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महानगरपालिका पार्किंग, हिलेज रोड, नाहूर याठिकाणी पथकाने सापळा रचला. यावेळी संशयित वाहनांची तपासणी केली असता ९ कंटेनर, २ टेम्पो, १ बोलेरो आणि १ पिकअप अशा एकूण ५ वाहनांसह ९ इसम पोलिसांच्या ताब्यात आले.
तपासणीदरम्यान वाहनांमध्ये १) वरानसी आंशिक सुगंधित सुपारी, २) सुगंधित तंबाखू आणि इतर प्रतिबंधित सुगंधित सुपारीचे पदार्थ आढळून आले. या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी १८ लाख २९ हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी जप्त केलेली ५ वाहने, ९ इसम आणि मुद्देमाल ताब्यात घेऊन भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.राज्यात गुटका बंदी असताना बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात गुटका अवैध मार्गाने राज्यात आणला जातो आणि तो छुप्या मार्गाने विकला जातो.यापूर्वीही मुंबई पोलिसांनी अनेकदा कारवाही केली तरी सुद्धा मुंबई असो किंवा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटका आणून विक्री केल्या जाते.त्यामुएल ही मोठी रॅकेट राज्यात असून त्याला उध्वस्त करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.गुटका माफिया यांचे काही राजकीय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याने अशा कारवाही नंतर मोठे मासे पळून जातात तर छोट्या माणसांना यात अडकवले जाते.गुटख्याचा दुरगामी परिणाम युवकांवर होत असल्याने याची पाळेमुळे खणून कडाडली पाहिजे.



