अन्न व औषध प्रशासनाचा राज्यभर कार्यवाहीचा धडाका. राज्यात २७ ठिकाणी छापे.
मनोज कुळकर्णी
मुंबई: महाराष्ट्रात सध्या गणेशोत्सवासारखा सर्वात मोठा सण सुरू आहे आणि याच सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल चालकावर अण्णा व औषध प्रशासनाच्या वतीने धाडी टाकण्याचे काम सुरू आहे आज राज्यात 27 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे नागपूर मध्ये दोन वाहन जप्त करत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई नवी मुंबई ठाणे रायगड पालघर पुणे सांगली कोल्हापूर नागपूर अहिल्यानगर,संभाजी नगर या जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने आज मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदी तुकाराम मुंढे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर धडक कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात सात लाख 38 हजाराचा दोन लाख 893 किलोग्रॅम दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे.राज्यभर एकूण २७ ठिकाणी छापे टाकण्यात आलेत.१४ आस्थापनाचे परवाने निलंबित करण्यात आले तर १३ आस्थापनाना सुधारणा नोटीस देण्यात आली आहे.
कुठे आणि कशी झाली कारवाही
- कोकण विभाग
१.काशिमीरा, मीरा रोड (ठाणे) -संशयास्पद खवा व गोड माव्याचा मोठा साठा जप्त
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी वाहन क्र. AR 20B 8986 (ट्रॅव्हलर) ची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान Khoya Loose (सैल खवा) 479 किलो ,किंमत ₹1,05,380/- तसेच Sweet Mawa (Shree Gajanand) 958 किलो,किंमत ₹2,10,760/- असा एकूण ₹3,16,140/- किमतीचा साठा आढळून आला.
सदर सैल खवा विनालेबल स्वरूपात तसेच इतर पॅकबंद अन्नपदार्थ अस्वच्छ वातावरणात आणि योग्य तापमान नियंत्रण न ठेवता साठवणूक व वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले. सदर अन्नपदार्थ निकृष्ट दर्जाचे, असुरक्षित व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून कलम 23, 26 व 27 नुसार उल्लंघनाप्रकरणी जप्त करण्यात आले.
२. वाहन क्र. AR-06-C-7795, काशिमीरा, मीरा रोड (ठाणे) -अस्वच्छ वातावरणात खवा व मावा वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी काशिमीरा पोलीस ठाण्यासमोर, मीरा रोड, जि. ठाणे येथे वाहन क्र. AR-06-C-7795 ची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान Khoya Loose (सैल खवा) 659 किलो, किंमत ₹1,44,980/- तसेच Sweet Mawa (Bajrang)220 किलो,किंमत ₹1,24,960/- असा एकूण ₹2,69,940/- किमतीचा साठा वाहनातून वाहतूक करताना आढळून आला.
सदर अन्नपदार्थांची अत्यंत अस्वच्छ वातावरणात साठवणूक व वाहतूक केल्याचे आढळल्याने अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील तरतुदींनुसार सदर साठा जप्त करण्यात आला.
- वाहन क्र. AR 01 Q 0822 (मे. श्री विजय ट्रॅव्हल्स), चारोटी टोल नाका (पालघर) -संशयास्पद गोड मावा जप्त
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी चारोटी टोल प्लाझा, जि. पालघर येथे मे. श्री विजय ट्रॅव्हल्सच्या अशोक लेलँड वाहनाची (वाहन क्र. AR 01 Q 0822) तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान Sweet Mawa (गोड मावा) या अन्नपदार्थाचा 174 किलो साठा आढळून आला. सदर अन्नपदार्थाची किंमत ₹48,720/- आहे.
सदर गोड मावा निकृष्ट दर्जाचा (Substandard) व मिथ्याछाप (Misbranded) असल्याचा संशय आल्याने अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या कलम 23, 26 व 27 चे उल्लंघन केल्याप्रकरणी जप्त करण्यात आला.
- पुणे विभाग
१.M/s. Vishnu Sweets and Dairy Products, कराड (जि. सातारा):
दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी तासवडे MIDC येथील आस्थापनेत तपासणीदरम्यान बॉक्स व ट्रेमधील मिळून १२६ किलो दुग्धजन्य मिठाई Milk Based Sweet, किंमत ₹६३,०००/-विनालेबल, अत्यंत अस्वच्छ वातावरणात तयार केल्याचे व निकृष्ट दर्जाची असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आली.
२.M/s. Amawa Milk & Milk Product, आकिवट (जि. कोल्हापूर):
दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी शिरोळ तालुक्यातील आकिवट येथे तपासणीदरम्यान खवा ९९ किलो किंमत ₹२४,७५०/- व रबडी ९८ किलो किंमत ₹१५,६८०/- असा एकूण १९७ किलो साठा किंमत ₹४०,४३०/- परवान्यात आवश्यक बदल न करता उत्पादन करणे व लेबलवरील त्रुटींप्रकरणी जप्त करण्यात आला. - नागपूर विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; २ वाहनांसह ₹१२.१० लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त, ३ जणांना अटक
अन्न व औषध प्रशासन, नागपूर विभागामार्फत प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या (गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखू इत्यादी) अवैध विक्री, साठवणूक व वाहतुकीविरुद्ध दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी धडक तपासणी कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईदरम्यान नागपूर विभागातील एकूण ३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली असता, तिन्ही ठिकाणी प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळून आला. या कारवाईत ₹४,१०,७८२/- किमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ₹८,००,०००/- किमतीची २ वाहने, असा एकूण ₹१२,१०,७८२/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३ आस्थापनांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अन्वये संबंधित पोलीस ठाण्यात ३ प्रथम खबरी अहवाल (FIR) दाखल करण्यात आले असून ३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. - मुंबईतील अन्न आस्थापनांवर कठोर कारवाई, ७ हॉटेल चे परवाना तत्काळ निलंबित
१.ग्राहक तक्रारीवरून कुलाबा येथील ‘ऑलिम्पिया कॉफी हाऊस’चा परवाना तात्काळ निलंबित
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी अन्न व औषध प्रशासनाने “Safe Food Safe Maharashtra” मोहिमेअंतर्गत प्राप्त तक्रारीच्या आधारे कुलाबा येथील M/s. Olympia Coffee House वर कारवाई करत आस्थापनेचा अन्न परवाना (क्र. ११५१९००१०००५११) तात्काळ निलंबित केला आहे.
तपासणीदरम्यान आस्थापनेमध्ये अन्नसाठवणूक क्षेत्रात मूत्रालय, अन्न तयार करण्याची व भांडी धुण्याची अस्वच्छ व्यवस्था, अन्नपदार्थांची जमिनीवर हाताळणी, अस्वच्छ पाण्याचा वापर, झुरळे व माशांचा प्रादुर्भाव, रेफ्रिजरेटरमध्ये मांसजन्य रक्ताचे अवशेष, कच्च्या शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे अयोग्य विभाजन, खराब कटिंग बोर्डचा वापर तसेच अन्न हाताळणाऱ्यांकडून आवश्यक संरक्षक पोशाखाचा वापर होत नसल्याचे आढळले. तसेच ३५ अन्न हाताळणाऱ्यांपैकी ३४ जणांकडे आवश्यक अन्न सुरक्षा प्रशिक्षण नसल्याचे आणि पाणी तपासणी अहवाल व आवश्यक स्वच्छता नोंदी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले.
सदर गंभीर त्रुटींमुळे अन्न सुरक्षा धोक्यात येऊन सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३२(३) सहवाचन अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायाचे परवाने व नोंदणी) विनियम, २०११ मधील विनियम २.१.८(४) अन्वये अन्न परवाना क्र. ११५१९००१०००५११ तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. निलंबन कालावधीत अन्नपदार्थांची खरेदी, तयार करणे, साठवणूक व विक्री/वितरण बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, त्रुटींची पूर्णतः दुरुस्ती व पुनर्तपासणी झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
२. M/s. Blink Commerce Private Limited, चेंबूर (मुंबई) -अन्न सुरक्षा नियमांचे व स्वच्छतेच्या मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना तत्काळ निलंबित (Forthwith Suspension) दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी M/s. Blink Commerce Private Limited, CTS क्र. 630 व 631, चेंबूर, पेस्तम सागर रोड नं. 4, मुंबई 400089 येथे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व विनियम 2011 मधील Schedule IV Part II च्या स्वच्छता व आरोग्यविषयक मानकांचे गंभीर उल्लंघन केल्याचे आढळून आले.सदर उल्लंघनाप्रकरणी संबंधित पेढीचा परवाना तातडीने निलंबित (Forthwith Suspension) करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
३. M/s. Vishwas Sweets And Snacks, घाटकोपर (पश्चिम), मुंबई -अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना तत्काळ निलंबित (Forthwith Suspension) दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी M/s. Vishwas Sweets And Snacks (चालक: श्री. नरेंद्र राजधारी गुप्ता), दुकान क्र. 24, पूरबाई बिल्डिंग, वेलकम हॉटेल समोर, जे. व्ही. रोड, घाटकोपर (पश्चिम), मुंबई 400086 येथे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदी व स्वच्छता मानकांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.सदर त्रुटींच्या पार्श्वभूमीवर जनआरोग्याचा विचार करून संबंधित आस्थापनेचा परवाना तातडीने निलंबित (Forthwith Suspension) करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
४. M/s. A-1 General & Dry Fruits, घाटकोपर (पश्चिम), मुंबई -अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना तत्काळ निलंबित (Forthwith Suspension) दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी M/s. A-1 General & Dry Fruits (चालक: श्री. रॉकी मन्नुलाल रावत), 8 2 27-A B, डॉमनिक सोरेस, अँटोनी चाळ, किरोळ रोड, खलाल व्हिलेज, विद्याविहार, घाटकोपर (पश्चिम), मुंबई 400086 येथे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
सदर उल्लंघनाप्रकरणी संबंधित दुकानाचा परवाना तातडीने निलंबित (Forthwith Suspension) करण्यात आला असून, नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
५. नायर हॉस्पिटल कॅन्टीन, मुंबई सेंट्रल -अस्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅन्टीनचा परवाना तत्काळ निलंबित (Forthwith Suspension) दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी नायर हॉस्पिटल कॅन्टीन, नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल येथे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षा व स्वच्छता मानकांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले.
रुग्ण व नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करून सदर कॅन्टीनचा परवाना तातडीने निलंबित (Forthwith Suspension) करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
६. M/s. Milan Punjab, वरळी (मुंबई) -अस्वच्छता व नियमांचा भंग केल्याप्रकरणी परवाना तत्काळ निलंबित (Forthwith Suspension)
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी M/s. Milan Punjab, दुकान क्र. 2/28, महिंद्रा टॉवर समोर, टी. व्ही. सेंटर जवळ, पी. बी. मार्ग, वरळी, मुंबई 400030 येथे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि नियम, विनियम 2011 मधील Schedule IV Part II नुसार आवश्यक स्वच्छता व आरोग्यविषयक मानकांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
सदर उल्लंघनाप्रकरणी आस्थापनेचा परवाना तातडीने निलंबित (Forthwith Suspension) करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
7.M/s. Sadguru Sweets, मालाड (पूर्व), मुंबई -अन्न सुरक्षा व स्वच्छता मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना तत्काळ निलंबित (Forthwith Suspension) दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी M/s. Sadguru Sweets, मालाड (पूर्व), मुंबई येथे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006, नियम व विनियम 2011 मधील Schedule IV Part II मधील तरतुदींचा भंग केल्याचे व स्वच्छतेचे निकष न पाळल्याचे आढळून आले.
सदर उल्लंघनाप्रकरणी सदर मिठाईच्या दुकानाचा परवाना तातडीने निलंबित (Forthwith Suspension) करण्यात आला असून, नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. - पुणे विभागातील अन्न आस्थापनांवर कठोर कारवाई, 4 हॉटेल चे परवाना निलंबन
१. M/s. Hotel New Nityanand and Ice Cream, पुणे -परवाना निलंबित
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी M/s. Hotel New Nityanand and Ice Cream, डिंभे खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान परवाना अट क्र. 3 सह परिशिष्ट 4 मधील स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
सदर उल्लंघनाप्रकरणी संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
२. M/s. Manas Family Restaurant, सातारा -परवाना निलंबित
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी M/s. Manas Family Restaurant, सुरूर, ता. वाई, जि. सातारा येथे तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान सुधारणा नोटीसचे (Improvement Notice) पालन न केल्याचे व परिशिष्ट 4 मधील नियमांचे उल्लंघन सुरू ठेवल्याचे आढळून आले.या कारणास्तव संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
३. M/s. R.P. Hospitalities (Rangala Punjab), पाषाण (पुणे) -परवाना निलंबित
दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी M/s. R.P. Hospitalities (Rangala Punjab), सुतारवाडी, पाषाण, पुणे येथे तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अन्न व्यवसायामध्ये FSSAI परवाना अट क्र. ३ मधील नियमांनुसार कामकाजातील बदलांची प्राधिकरणाला माहिती न देणे, तसेच परिशिष्ट ४ (Schedule 4) मधील स्वच्छता आणि अन्न हाताळणीच्या मानकांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. सदर उल्लंघनाप्रकरणी आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
४. M/s. Manisha Dosa Center, कर्वेनगर (पुणे) -परवाना निलंबित
दि. 17 सप्टेंबर 2026 रोजी M/s. Manisha Dosa Center, अमरपुरी, कर्वेनगर, पुणे येथे तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अन्न व्यवसायामध्ये FSSAI परवाना अट क्र. ३ मधील नियमांनुसार कामकाजातील बदलांची प्राधिकरणाला माहिती न देणे, तसेच परिशिष्ट ४ (Schedule 4) मधील स्वच्छता आणि अन्न हाताळणीच्या मानकांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. - नागपूर विभागातील अन्न आस्थापनांवर कठोर कारवाई, २ हॉटेल चे परवाना निलंबन
१. M/s. Superbaker (EMRLD Coffee Shop), नागपूर -स्वच्छता मानकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परवाना निलंबित
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी M/s. Superbaker (EMRLD Coffee Shop), धरमपेठ, नागपूर येथे तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान परिशिष्ट 4 मधील स्वच्छता व अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.याप्रकरणी आस्थापनेचा निलंबित करण्यात आला आहे.
२. मे. सुराही रेस्टॉरंट अँड बार, नागपूर -अस्वच्छतेप्रकरणी परवाना निलंबित
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी मे. सुराही रेस्टॉरंट अँड बार, नंदनवन, नागपूर येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान परिशिष्ट 4 मधील स्वच्छता निकषांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले.याप्रकरणी आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. - P4B Technologies Service Pvt. Ltd., खारघर (रायगड) -तपासणीत त्रुटी आढळल्याप्रकरणी परवाना निलंबित
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी P4B Technologies Service Pvt. Ltd., सेक्टर 11, खारघर, जि. रायगड येथे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक असणाऱ्या नियमांचे उल्लंघन व विविध त्रुटी आढळून आल्या.सदर तपासणीत आढळून आलेल्या त्रुटींच्या आधारे संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला असून, नियमानुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. - पुणे विभागात संशयास्पद व नियमबाह्य अन्नसाठ्यावर कारवाई; ₹१.७२ लाखांचा अन्नसाठा जप्त
१.M/s. Paras Chemicals Industries, कोंढवा (पुणे):
दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी कोंढवा बुद्रुक येथे तपासणीदरम्यान Glucose D चा १६४.८ किलो साठा (किंमत ₹६१,८००/-) विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. हे उत्पादन निकृष्ट दर्जाचे व मिथ्याछाप (Misbranded) असल्याचा संशय असल्याने जप्त करण्यात आले.
२.मौर्या नमकीन, हरीपूर (जि. सांगली):
दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी हरीपूर (ता. मिरज) येथे अन्न परवाना/नोंदणी नसताना तसेच लेबल नियमांचे उल्लंघन करून तयार केलेला २६८ किलो Chilli Mili (namkeen, किंमत ₹५३,६००/-) साठा जप्त करण्यात आला असून आस्थापनेला थेट व्यवसाय बंदचे (Stop Business Activity) निर्देश देण्यात आले.
तपासणी मोहिमेदरम्यान ₹२०,०००/- पेक्षा कमी किमतीचे संशयास्पद, विनालेबल व अस्वच्छ वातावरणात साठवलेले अन्नपदार्थ आढळल्याप्रकरणी खालील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली: - M/s. Krishna Traders, पंढरपूर (जि. सोलापूर): दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी ९९ किलो मनुका/बेदाणा (किंमत ₹१७,८२०/-) संशयास्पद व लेबल उल्लंघनाखाली आढळल्याने व्यवसाय बंदची (Stop Business) नोटीस बजावण्यात आली.
- M/s. Bikaner Sweets, मंगळवेढा (जि. सोलापूर): मुदत संपलेली नोंदणी व अस्वच्छतेप्रकरणी ४० किलो संशयास्पद लाडू (किंमत ₹१६,०००/-) जप्त.
- M/s. Madhuri Dairy, नागाळा पार्क (जि. कोल्हापूर): विनालेबल व निकृष्ट दर्जाच्या संशयावरून २९ किलो लो फॅट पनीर (किंमत ₹११,६००/-) जप्त.
- M/s. Rajasthan Sweets, सांगली: खरेदी बिल उपलब्ध नसलेला २३ किलो बुंदी व ८ किलो म्हैसूर पाक (एकूण ३१ किलो, किंमत ₹१०,२३०/-) संशयास्पद साठा आढळल्याप्रकरणी कारवाई.
- M/s. S R Agencies, अकलूज (जि. सोलापूर): संशयास्पद व भेसळयुक्त १२ किलो गायीचे तूप (किंमत ₹१०,०००/-) जप्त.
- M/s. Chaudhari Bandhu Mithaiwale, कराड (जि. सातारा): अस्वच्छ वातावरणातील ६ किलो मोदक, ५ किलो बुंदी व ३ किलो लाडू (एकूण १४ किलो, किंमत ₹६,३६०/-) जप्त.
- M/s. Limsade Bandhu Mithaiwale, तासगाव (जि. सांगली): अस्वच्छ वातावरणात तयार केलेला २० किलो बुंदी लाडू (किंमत ₹२,८६७/-) जप्त.
- छत्रपती संभाजीनगर: ₹१.९२ लाखांची १,२२१ किलो संशयास्पद मिठाई जप्त; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
M/s. Sagar Somesh Limbore, छत्रपती संभाजीनगर -विनापरवाना व्यवसाय व संशयास्पद मिठाई साठ्याप्रकरणी कारवाई
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी M/s. Sagar Somesh Limbore यांच्या ताब्यातील साठ्याची पंचवटी हॉटेलसमोरील पार्किंगजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान Delicious Sweet (Siddheshwari) 368 किलो ,किंमत ₹45,560/-,Sweet Halwa133 किलो , किंमत ₹22,610/-, Premium Dessert (Ganesha) 148 किलो (किंमत ₹25,160/-), Delicious Sweet (Krishna) 358 किलो ,किंमत ₹60,860/- आणि Halwa (Krishna) 214 किलो (किंमत ₹38,520/-) असा एकूण 1,221 किलो संशयास्पद मिठाईचा साठा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले, ज्याची एकूण किंमत ₹1,92,710/- इतकी आहे.
सदर अन्न व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे, तसेच अन्नपदार्थांची अत्यंत अस्वच्छ वातावरणात साठवणूक केल्याचे आणि हे सर्व खाद्यपदार्थ भेसळयुक्त असल्याचा संशय असल्याने अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. - अहिल्यानगर व नाशिक रोड येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; संशयास्पद मिठाई, गूळ व तुपाचा साठा जप्त
दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी अन्न व औषध प्रशासनामार्फत अहिल्यानगर व नाशिक रोड येथील आस्थापनांवर तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सदर तपासणीदरम्यान खालीलप्रमाणे अन्नपदार्थांचा साठा आढळून आला: - M/s. Rajsthan Sweet, नेवासा (जि. अहिल्यानगर): तपासणीदरम्यान 25 किलो Khoya based sweet (खव्याची मिठाई, किंमत ₹8,750/-) अस्वच्छ वातावरणात तयार व साठवणूक केल्याचे तसेच ती निकृष्ट दर्जाची (Substandard) असल्याचा संशय आल्याने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले.
- M/s. Shree Mahaveer Super Market, जेल रोड (नाशिक रोड): तपासणीदरम्यान 644.4 किलो Jaggery (गूळ, किंमत ₹64,440/-) निकृष्ट दर्जाचा असल्याच्या संशयावरून, तसेच 12.5 लिटर Ghee (तूप, किंमत ₹10,625/-) यावर लेबल नियमांचे उल्लंघन (Label contravention) आढळल्याने कायदेशीर तरतुदींचा भंग केल्याचे निदर्शनास आले.
सदर दोन्ही प्रकरणांत अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
अन्न पदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार नोंदणीसाठी:
अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत अथवा गैरप्रकाराबाबत तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ तसेच Food & Drug Grievance Portal (https://complaints.mahafda.in) वर संपर्क साधावा.
प्रशासनाचे आवाहन:
“महाराष्ट्रात अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत शासन अत्यंत कठोर आहे. ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थ



