मुंबई

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत अनंत अंबानींचाही ठेका

मुंबई : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी निघालेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या विसर्जन मिरवणुकीत उद्योजक अनंत अंबानी यांनीही उत्साहात सहभाग घेतला. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अनंत अंबानी यांनी मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसोबत गणेशभक्तांच्या उत्साहात ठेका धरला.

विशेष म्हणजे अनंत अंबानी हे लालबाग गणेशोत्सव मंडळाचे मानद सदस्यही आहेत.

‘बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा’ या गणपती गीताच्या तालावर अनंत अंबानी यांनी मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांसोबत नृत्य करत गणरायाच्या भक्तीत सहभाग घेतला. त्यांच्या या सहभागामुळे मिरवणुकीतील उत्साह आणखी वाढला.

अनंत अंबानी हे गेल्या काही वर्षापासून लालबाग गणेश विसर्जन मिरवणुकीत सामील तर होतातच पण राजाच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर स्वतः हजर असतात.त्यांच्यासह पूर्ण अंबानी परिवार लालबाग राजाच्या दर्शनाला न चुकता दरवर्षी येत असतात.

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती असते. यंदाही गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईकरांसह देशभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

Related Articles

Back to top button